मलेशिया: पेनांगमध्ये साखर पुरवठा सुरळीत होण्याची चिन्हे

बुकित मेर्तजाम : पेनांग राज्यातील साखरेचा तुटवडा कमी करण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ डोमॅस्टिक ट्रेड अँड कॉस्ट ऑफ लिव्हिंग (केपीडीएन) ने अलिकडेच पाच मुख्य घाऊक विक्रेत्यांची नियुक्ती केली आहे. राज्य केडीपीएनचे संचालक एस. जेगन यांनी सांगितले की, साखर पुरवठा चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी घाऊक व्यापारी आणि किरकोळ विक्रेते यांदरम्यान, राज्य केपीडीएन मध्यस्त म्हणून काम करेल. ते म्हणाले की, आम्ही कालपासून राज्यात पाच जिल्ह्यांमध्ये एक मुख्य घाऊक व्यापारी नियुक्त केला आहे. त्यांना अतिरिक्त ३० टक्के साखर पुरवठा केला जाईल. या महिन्यात पिनांगमध्ये ६२८.४ टन साखर पुरवठा केला गेला आहे. हा पुरवठा राज्यासाठी पुरेसा असल्याचा दावा त्यांनी केला.

संचालक एस. जेगन यांनी सांगितले की, साखर तुटवड्याचा सामना करीत असलेल्या किरकोळ विकेत्यांना थेट घाऊक विक्रेत्यांच्या माध्यमातून आपल्या दुकानात पुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी ते आमच्याशी अथवा थेट व्यापाऱ्यांशी संपर्क साधू शकतात. जेगन म्हणाले की, आतापर्यंत त्यांनी आठ किरकोळ विक्रेत्यांना त्यांच्या आऊटलेटमध्ये साखर पुरवठा करून मदत केली आहे. ते म्हणाले की, अलीकडे राज्यातील विविध दुकानांमध्ये साखरेचा तुटवडा निर्माण झाला. या परिस्थितीला घाबरून ग्राहकांनी जादा खरेदी केली. आताच्या उपक्रमामुळे, साखर पुरवठ्यात आणखी अडचणी येणार नाहीत. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. बाजारात साखरेचा पुरेसा पुरवठा आहे याची खात्री करण्यासाठी उत्पादक आणि घाऊक विक्रेत्यांसोबत काम करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here