मलेशिया सरकारची clear refined white sugar च्या उत्पादनास मंजुरी

पुत्रजया : मलेशिया सरकारने दोन स्थानिक साखर उत्पादक कंपन्यांना क्लियर रिफाइंड व्हाइट शुगर (clear refined white sugar) चे उत्पादन करण्याची परवानगी दिली आहे. याची किंमत बाजारातील दरानुसार निश्चित केली जाणार आहे. देशांतर्गत व्यापार मंत्री सलाउद्दीन आयुब यांनी सांगितले की, एमएसएम मलेशिया होल्डिंग्स बेरहाद आणि सेंट्रल शुगर्स रिफायनरी एसडीएन बीएचडी (CSR) यांनी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एक अर्ज सादर केला होता. सरकारने या अर्जास मंजुरी दिली आहे. कारण, ग्राहकांना यामधून रिफाइंड आणि मोठ्या रिफाईंड सफेद साखरेशिवाय क्लिअर रिफाइंड सफेद साखरेचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.

सरकारने MSM आणि CSR ला सरकारकडून नियंत्रित दरावर किरकोळ बाजारासाठी पुरेशा प्रमाणात रिफाइंड व्हाइट शुगर (coarse and refined) चे उत्पादन सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यापैकी coarse refined white sugar ची प्रती किलो किंमत RM२.८५ आणि refined white sugar ची किंमत RM२.९५ आहे.

शुगर रिफायनिंग उद्योग आधी सरकारसोबत किरकोळ साखरेचा दर वाढविण्याविषयी चर्चा करीत होता. यामध्ये २०१३ नंत केवळ १ सेनची निव्वळ वाढ दिसून आली आहे. coarse refined white sugar साठी २०१७ मध्ये RM२.९५/kg ची किंमत २०१८ मध्ये याच्या सध्याच्या RM२.८५/kg पर्यंत कमी होण्याआधी ११ सेनने वाढली होती. पुरवठा नियंत्रण अधिनियम १९६१ आणि दर नियंत्रण आणि नफाखोरी विरोधी अधिनियम २०११ अंतर्गत साखर एक नियंत्रित वस्तू आहे. त्याची जास्त किमतीला विक्री करणाऱ्यास RM१,००,००० दंड, तीन वर्षांचा तुरुंगवास अथवा या दोन्ही गोष्टींचा सामना करावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here