‘खरा मित्र‘ मालदीव ने दिली भारताला उपाधी, साखरेसह इतर आवश्यक वस्तू भारतातून थेट मालदीवमध्ये

नवी दिल्ली : कोरोंना संकटात भारताने असंख्य देशांना मदत केली आहे. अलीकडेच भारताने मालदीव ला साखरेसह इतर आवश्यक वस्तूं देवून त्यांना सहकार्य केले. मालदीव चे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सालीह यांनी सांगितले की, भारताने कोरोनाच्या महामारीत मोठी मदत करुन भारत आमचा खरा मित्र बनला आहे. भारताकडून उपहार रुपाने दिलेल्या 580 टक आवश्यक वस्तूंचा एक टप्पा मंगळवारी भारतीय नौदलाच्या जहाजातून मालदीवमध्ये पोचला. शिपमेंट मध्ये 200 टन तांदूळ, 140 टन कणिक, 80 टन साखर, 120 टन मटर, 26 टन कांदा आणि 14 टन बटाटे यांचा समावेश आहे.

राष्ट्रपती सोलीह यांनी सांगितले की, कोविड 19 संकटा दरम्यान, भारतच मालदीव चा खरा मित्र बनला आहे. या आव्हानात्मक पार्श्‍वभूमीवर आवश्यक साहित्य पुरवठा भारताने केला. आमची मैत्री आणि उदारतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भरतातील लोकांना आमच्याकडून धन्यवाद. कोविड 19 महामारी दरम्यान, यापूर्वी भारताने तीन महिन्यांसाठी आवश्यक औषधेही दिली होंती.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here