दुकान, औद्योगिक युनिटबाहेर जीएसटी क्रमांक लिहिणे अनिवार्य

नवी दिल्ली : जीएसटी नेटवर्क पोर्टलवर नोंदणीकृत व्यावसायिकांनी आपले दुकान अथवा औद्योगिक युनिट अथवा कार्यालयाबाहेरील बोर्डवर जीएसटी नंबर लिहिणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर एखाद्या व्यावसायिकाने जीएसटी क्रमांक सार्वजनिक केला नसेल तर त्याला ५०,००० रुपयांपर्यंत दंड होवू शकतो. गेल्या १६ मे रोजी केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क विभागाच्यावतीने (सीबीआयसी) जीएसटी व्हेरिफिकेशनसाठी अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत सीबीआयसीच्या अधिकाऱ्यांनी सर्व व्यावसायांना जीएसटी नंबर प्रदर्शित करण्याचा नियम लागू केला आहे.

दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, १५ जुलैपर्यंत सुरू राहणाऱ्या या अभियानांतर्गत अधिकारी जीएसटी नोंदणी करण्यात आलेल्या सर्व व्यावसायिकांपर्यंत पोहोचतील. त्यामध्ये त्यांच्या क्रमांकाची सत्यता पडताळली जाईल. या अभियानाच्या माध्यमातून जीएसटी कलेक्शन वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल. याबाबत जीएसटी एक्स्पर्ट्सनी सांगितले की, व्यावसायीकांनी आपल्या परिसरातील साईन बोर्डवर जीएसटी नंबर, मोबाईल नंबर, पत्ता, ईमेल आयडीही लिहिलेले असणे गरजेचे आहे. या मोबाईल नंबरवर जीएसटी नंबर घेणाऱ्या फर्मच्या मालकांचा संपर्क क्रमांक असला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here