कारखान्यात ऊस वजनात हेराफेरी, भाकियूचा आंदोलनाचा इशारा

हसनपूर : हसनपूरमधील कालाखेडा गावातील किसान सहकारी साखर कारखान्यात उसाच्या वजनात हेराफेरीचा आरोप करत भारतीय किसान संघाने कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

२३ फेब्रुवारी रोजी भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष कृष्ण कुमार शर्मा हे टिप्परमधून ऊस घेऊन कारखान्याकडे जात होते. या मार्गावरील हसनपूरमधील वजनकाट्यावर त्यांनी ऊस वजन केला. त्यावेळी त्याचे वजन ५७.२० क्विंटल आले. कारखान्याच्या गेटवर वजन केल्यानंतर ते ५६.५५ क्विंटल इतके भरले. वजनात ६५ किलोचा फरक दिसल्याने त्यात घोटाळा केला जात असल्याचा आरोप कृ्ष्ण कुमार शर्मा यांनी केला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.

कारखान्याच्या गेटवरील आणि ऊस खरेदी केंद्रांवरील वजनकाटे तपासण्याची मागणी शर्मा यांनी केली होती. वजनात घोटाळा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली. याबाबत शर्मा यांनी सांगितले की, जर याप्रश्नी कारवाई झाली नाही, तर कारखान्यासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. शेतकऱ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही. यावेळी चंद्र प्रकाश शर्मा, सुखदेव शर्मा, महिपाल सिंह, सतीश त्यागी, महावीर शर्मा, नरेंद्र सिंह, यशवीर सिंह, सागर सिंह, ओमवीर सिंह, वरुण शर्मा यांच्यासह शेतकरी, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here