ऊस दरप्रश्नी मनोहर लाल खट्टर यांची पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर टीका

चंडीगड : हरियाणातील शेतकऱ्यांना गेल्या सात वर्षापासून देशात सर्वाधिक ऊस दर मिळत आहे असे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सांगितले. हरियाणा सरकार एमएसपीवर दहा पिकांची खरेदी करते. त्यामध्ये भात, गहू, बाजरी, डाळ, मूगळ, मक्का, सू्र्यफूल, भुईमूग, कापूस आदी पिकांचा समावेश आहे. आणि या पिकांची आधारभूत किंमत थेट शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये केली जाते.

शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर पंजाबला हरियाणाशी बरोबरी करण्याची गरज का वाटली ? अशी टीका खट्टर यांनी केली. त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या वक्तव्याचा दाखला देत एक आठवड्यापूर्वी २०२१-२२ मधील गळीत हंगामात ऊस दरवाढीला मंजूरी दिल्याची आठवण करून दिली.

पंजाबमधील काँग्रेस सरकारवर आपल्या राज्यातील शेतकऱ्यांमधील असंतोषाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केल्यानंतर मुख्ममंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आठ ट्वीट्स केले आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सराकरकडून उचलल्या गेलेल्या विविध उपायांची माहिती देण्यात आली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here