नवी दिल्ली : जागतिक स्तरावर आर्थिक स्थिती खराब असतानाही गेल्या तीन महिन्यांमध्ये भारतातील कारखान्यांतील उत्पादनाला वेग आला आहे. एसअँडपी ग्लोबलद्वारे जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग इंडेक्स गेल्या ऑक्टोबर महिन्यातील ५५.३ च्या तुलनेत वाढून ५५.७ झाला आहे. कारखान्यांतील उत्पादन वाढीचा हा सलग १७ वा महिना आहे. पीएमआय रिडिंग ५५.० या रॉयटर्सच्या सरासरी पुर्वानुमानापेक्षा अधिक आहे.
जागरणमध्ये प्रकाशित वृ्त्तानुसार, मागणीत वाढ झाल्याने भारतात मॅन्युफॅक्चरिंग आउटपुटमध्ये वाढ झाली आहे. तीन महिन्यांच्या मध्यावधीसाठी नव्या ऑर्डर आणि उत्पादनात तेजी दिसून आली आहे. याशिवाय कंपन्या विकासाप्रती आश्वस्त झाल्याचे दिसून येत आहेत. देशात रोजगार संधी वाढत असल्याचे सर्व्हेमध्ये दिसून आले आहे. ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदाच भारताचा ग्राहक मूल्य लाभ इंडेक्स ७ टक्क्यांपेक्षा खाली गेला आहे. पुढील वर्षी भारतातील विकास दर मजबूत राहिल अशी अपेक्षा आहे. आरबीआय आणि सरकार जागतिक कठीण परिस्थितीतही आशियातील तिसऱ्या महाशक्तीच्या रुपात स्थिरतेसाठी प्रयत्न करीत आहेत.