मराठा आंदोलनाची झळ : अजित पवारांनी माळेगाव कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभाला जाने टाळले

पुणे : मराठा आरक्षण प्रश्नी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाची झळ राजकीय नेत्यांना बसू लागली आहे. शनिवारी याचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही बसल्याचे समजते. बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (27 ऑक्टोबर 2023) होणार होता. मात्र, मराठा क्रांती मोर्चाने अजित पवार यांना कारखान्यात येण्यास विरोध करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.त्याच पार्श्वभूमीवर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जमले आहेत. कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.

मराठा आंदोलकानं ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले कि, आम्ही दोन दिवसांपूर्वी कारखाना आणि पोलीस प्रशासनाला पत्र दिले होते. त्यानुसार शुक्रवारी पोलीस आणि कारखाना प्रशासनाबरोबर बैठक पार पडली. पण, अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांना मोळी पुजनसाठी कारखाना प्रशासन आग्रही होते. कारखाना प्रशासन राजकीय नेत्यांना बोलवत असेल, तर आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. गाड्यांना आडवू किंवा लाठ्या-काठ्या खाण्यासाठी आमची तयारी आहे. दरम्यान, मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर अजित पवारांनी बारामती दौरा रद्द केल्याची माहिती समोर येत आहे. मराठा आरक्षणाला आमचा पाठींबा आहे. शेतकऱ्यांच्या हस्ते मोळीपूजन करा, असं निरोप अजित पवारांनी कारखान्याच्या अध्यक्षांना पाठवल्याचं सांगितलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here