मराठवड्यात ऊस उत्पादकांना ठिबक सिंचन सक्ती

मुंबई : चीनी मंडी राज्यातील काही भागांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी पाण्याचा अतिरिक्त वापर करू नयेत. यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. स्वदेश फाऊंडेशनच्या वतीने आयोजित राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते महाजन म्हणाले, ‘इतर पिकांच्या तुलनेत ऊस पिकाला चौपट पाणी लागते आणि महाराष्ट्राच्या सारख्या दुष्काळाची झळ दीर्घकाळ सोसलेल्या राज्यात हे चालणार नाही.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकतर ठिबक सिंचनाची व्यवस्था स्वीकारावी लागेल किंवा त्यांना त्यांची पिक पद्धती मोठ्याप्रमाणावर बदलावी लागेल. राज्यातील मराठवाड्यासारख्या भागात जिथं पाण्याचं दुर्भिक्ष आहे. तिथं आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सक्तीने ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.’ फाऊंडेशनने राज्यात गेल्या पाच वर्षांत ४२४ पाणी योजनांच्या माध्यमातून ३२ हजार घरांमध्ये तसेच १५० शाळांमध्ये पाणी पोहोचविले असून, जवळपास २१०० एकर जमीन ओलिताखाली आणली आहे. केंद्र सरकारही जलसंधारण क्षेत्रात पुढाकार घेत असून, जल शक्ती अभियानाच्या माध्यमातून साडे तीन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

रॉनी आणि झरीन स्क्रूवाला यांनी स्वदेश फाऊंडेशनची सुरवात केली आहे. रायगड जिल्ह्यातील सात तालुके आणि ३८८ ग्रामपंचायतींमध्ये त्यांनी काम केले आहे. दर वर्षी देशातील ग्रामीण भागातील एक लाख नागरिकांचे सक्षमीकरण करण्याचे ध्येय या फाऊंडेशनने डोळ्यासमोर ठेवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ग्रामीण समाज परिवर्तन मोहितमेत या फाऊंडेशनचा सहभाग आहे. याबाबत झरीन स्क्रूवाला म्हणाल्या, ‘अनेक वर्षांपासून गावातील लोक एकत्र आलेले नाहीत. त्यांना एक करण्यासाठी पाण्याचा पर्याय आमच्यासाठी आव्हानात्मक होता. पाण्याशी संबंधित प्रशिक्षित गटांच्या माध्यमतातून पाण्याच्या व्यवस्थेचे योग्य व्यवस्थापन करण्यावर फाऊंडेशनने भर दिला आहे.’

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here