मार्कंडेय साखर कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीकडे लक्ष

बेळगाव : काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीबाबत सभासदांना उत्सुकता लागली आहे. कारखान्याची निवडणूक नुकतीच अत्यंत अटीतटीने झाली आहे. या निवडणुकीत तानाजी पाटील आणि आर. आय. पाटील यांच्या शेतकरी बचाव पॅनेलने मोठा विजय मिळविला. या पॅनेलमध्ये सहकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या तिघांचा समावेश आहे. त्यामध्ये ही माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मार्कंडेय सहकारी कारखाना सहकार खात्याच्या सूचनांनुसार चालतो. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची सहकार खात्याचे उपनिबंधक कोणती तारीख निवडतात, हे पाहावे लागणार आहे. सहकार खात्याच्या सूचनेनंतर सात दिवसांच्या आत दीक्षा आणि उपाध्यक्ष निवडने आवश्यक असते. त्यामुळे उपनिबंधक कधी आदेश काढतात, याकडे संचालक आणि सभासदांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here