मारुती सुझुकी २०२३ पर्यंत करणार फ्लेक्स-फ्लूएल इथेनॉल इंजिनची निर्मिती

नवी दिल्ली : भारतातील अग्रणी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने सीएनजी संचलित लाइनअप मधील यशस्वी कामगिरीनंतर आता इथेनॉलवर चालणाऱ्या इंजिनबाबत काम सुरू केले आहे. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे एसीआय, सीटीओ सी. व्ही. रमण यांनी अलिकडेच सांगितले की, कंपनीने E ८५ (८५ टक्के इथेनॉल) वर काम करणाऱ्या सक्षम इंजिनचा विकास सुरू केला आहे. भारत सरकारने E २० इंधन सादर करण्याचे धोरण स्वीकारल्यानंतर सर्व प्रवासी श्रेणीतील वाहने एप्रिल २०२३ पर्यंत E २० अनुसार असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. रमण यांनी सांगितले की, ई २० इंधनाच्या वापराने आणखी फायदा होईल. त्यांनी सांगितले की, भारताने जर बीएस ६ मानदंडासोबत (युरो ५ उत्सर्जन मानदंड) ई ८५ इंजिनचा वापर केल्यास असे करणारा हा जगातील पहिला देश असेल. सद्यस्थितीत जगभरात E ८५ सोबत BS4 अनुरूप इंजिनी वापरले जाते.

भारतात वापरल्या जाणाऱ्या सध्याच्या इंधनात १० ते १५ टक्के इथेनॉलचे मिश्रण केले जाते. मात्र, इंजिनमध्ये २०-२५ टक्के इथेनॉलचा वापर करण्यास योग्य बनविण्यासाठी पॉवरट्रेनमध्ये सुधारणांची गरज असते. E85 अनुपालनासाठी ईसीयूचे रिमॅपिंग, इंजेक्शन आणि इग्निशन सिस्टीमधील सुधारणांची गरज असते. मारुती सुझुकी वैकल्पिक इंधन तंत्रज्ञानावर अग्रक्रमाने संशोधन करीत आहे. सीएनजी पॉवरट्रेन आणि इथेनॉलच्या आसपास विकासावर सध्याच्या फोकसशिवाय, मारुती सुझुकी बायो-सीएनजीतील संधीही शोधत आहे. मारुती सुझुकीचा विश्वास आहे की, सर्व इलेट्रॉनिक वाहनांचे भविष्य असूनही पेट्रोल, सीएनजीवर चालणारी आयसी इंजिन वाहने आगामी काही वर्षात प्रमुख व्हॉल्यूम ड्रायव्हर्स राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here