महाराष्ट्र : यंदा सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ऊस क्षेत्र

98

सोलापूर : आगामी ऊस हंगामात सोलापूर जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक, दोन लाख ३० हजार ५० हेक्टर ऊस अपलब्ध असेल असे अनुमान आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात ३३ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात सहभाग घेतला होता. या वर्षी विठ्ठल सहकारी आणि आर्यन साखर कारखाना यामध्ये सहभागी होतील. या वर्षी राज्यात १४ लाख ८७ हजार ८३६ हेक्टर ऊस क्षेत्र उपलब्ध आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये ९३४ हेक्टरची घट आली आहे.

साखर आयुक्त कार्यालयाकडील आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या हंगामाच्या तुलनेत अहमदनगर जिल्ह्यात ऊसाच्या क्षेत्रात सर्वाधिक ४७ हजार ८०५ हेक्टरची घट झाली आहे.

बीडसह तीन जिल्ह्यांत ऊसाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. बीड जिल्ह्यात गेल्या हंगामात तोडणीसाठी ४९ हजार ५८२ हेक्टर क्षेत्र होते. तर यावर्षी हे क्षेत्र ८४ हजार २०८ हेक्टर इतके आहे. जालना जिल्ह्यात गेल्या हंगामात ३४ हजार ४३४ हेक्टर ऊस क्षेत्राची तोडणी करण्यात आली होती. या हंगामात ४७ हजार २२७ हेक्टरमधील ऊस तोडणीसाठी उपलब्ध असेल. गेल्या हंगामात सांगली जिल्ह्यात ९२ हजार ७१५ हेक्टरमध्ये ऊस उपलब्ध होता. यंदा १ लाख ३७ हजार ५८५ हेक्टरमध्ये ऊस पिक तोडणीसाठी उपलब्ध होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here