साखर गैरव्यवहारात मायावती अडकणार?

लखनौ : उत्तर प्रदेशातील कथित साखर गैरव्यवहारात बसपच्या नेत्या मायावती अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या साखर गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने छापे टाकून कारवाईला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशातील माजी सनदी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर छापे टाकले आहेत. त्यातून या कारवाईचा फास मायावतींभोवतीही आवळला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मायावतींच्या मुख्यमंत्री काळातील त्यांच्या प्रमख सचिव राहिलेल्या नेतराम आणि विनय प्रिय दुबे यांच्या निवासस्थांनावर सीबीआयने छापे टाकले आहेत.

यातील नेतराम हे मायवतींचे अतिशय विश्वासू सहकारी होते. मायावतींच्या इशाऱ्यांवर नेतराम निर्णय घेत होते. त्यावेळी कॅबिनेट मंत्र्यांनाही नेतराम यांची भेट घेण्यासाठी वेळ घ्यावी लागत होते. यावरूनच त्यांच्या राजकीय आणि प्रशासकीय वजनाचा अंदाज येईल. मायावतींच्या कार्यकाळात नेतराम हे अतिशय ताकदवान अधिकारी म्हणून ओळखले जायचे. अबकारी कर, कृषी उत्पादन, खाद्य आणि ऊस या क्षेत्रात त्यांनी विशेष लक्ष दिले होते. मायावती सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर अखिलेश यादव यांनी नेतराम यांनी फुटकळ खाती दिली होती. नेतराम २०१४ मध्ये निवृत्त झाले. पण, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नेतराम पुन्हा चर्चेत आले होते. बसपच्या तिकिटावर ते निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण, तसे घडले नाही.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here