साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांची थकबाकी भागवली

126

मेरठ : जनपद च्या चार साखर कारखान्यांनी मंगळवारी 42.35 करोड रुपयांची ऊस थकबाकी भागवली. जिल्हा ऊस अधिकारी डॉ. दुष्यंत कुमार यांनी सागितले की, दौराला ने 15.52 करोड, किनौनी ने 2.08 करोड, नंगलामल ने 15.75 करोड आणि मोहिद्दीनपूर ने 8.98 करोड इतके शेतकर्‍यांचे पैसे भागवले आहेत. त्यांनी सांगितले की, याबरोबरच जिल्ह्यातील एकूण 1480 करोड रुपयांसह 56 टक्के ऊसाची थकबाकी भागवली गेली आहे. याशिवाय साखर कारखान्यांकडून ऊस शेतकर्‍यांचे 1156 करोड रुपये देय आहेत.

जिल्हा ऊस अधिकारी डॉ. दुष्यंत कुमार यांनी मंगळवारी सर्व साखर कारखान्यांच्या अधिकार्‍यांसह व्हिडियो कॉन्फरसिंग च्या माध्यमातून ऊस थकबाकी भागवण्याचे आदेश दिले. ते म्हणाले, थकबाकी भागवण्यात विलंब करणार्‍या साखर कारखान्यांविरोधात कारवाई केली जाईल. मंगळवारी पांडव नगर येथे असणार्‍या ऊस विभागाच्या कार्यालयात सॅनिटायझेशन करण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व साखर कारखाना क्षेत्रांमध्ये ऊस सर्वेक्षण कार्य शेवटच्या टप्प्यात पोचले आहे. जिल्हा ऊस अधिकार्‍यांनी सांगितले की, पुढच्या एका आठवड्यात सर्वेक्षण कार्य पूर्ण केले जाईल. यासाठी शेतकर्‍यांनी आपले घोषणा पत्र भरुन ऊस विभागला द्यावे. ज्यामुळे ऊस थकबाकी भागवणे आणि पावत्या आदी कार्यात अडचणीत येणार नाही.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here