मेरठ : गेल्या हंगामापेक्षा ४६.७५ लाख क्विंटल जादा उसाचे गाळप, साखर उतारा घटला

105

मेरठ : साखर कारखान्यांच्या गळीत हंगाम २०२०-२१ ची समाप्ती झाली आहे. परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांतील सोळा साखर कारखान्यांचे कामकाज थांबले आहे. ऊस विभागाकडील अहवालानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऊस गाळपात वाढ झाली आहे. त्याशिवाय, साखर उत्पादनात घट दिसून आली आहे. साखरेचा उतारा घटला आहे.

गाळप हंगाम २०१९-२० मध्ये मेरठ परिक्षेत्रात १६ साखर कारखान्यांनी १६१७.८४ लाख क्विंटल उसाचे गाळप केले. तर गाळप हंगाम २०२०-२१ मध्ये गाळपाचा आकडा १६६४.५९ क्विंटलवर पोहोचला. अशा पद्धतीने गतवर्षीपेक्षा ४६.७५ लाख क्विंटल अधिक गाळप झाले आहे. सर साखर उत्पादन गेल्यावर्षी १८३.३३ लाख क्विंटल झाले होते. यंदा १८०.८३ लाख क्विंटल झाले आहे. साखर उत्पादनात २.५ लाख क्विंटलची घट झाली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here