मेरठ: ७६ गावांतील ऊसाचे सर्वेक्षण पूर्ण

हस्तिनापूर : ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांनी मवाना साखर कारखाना आणि टिकोलातील हस्तीनापूर क्षेत्रातील गणेशपू गावात सुरू असलेल्या सर्व्हेची अचानक पाहणी केली. मवाना सहकारी ऊस विकास समितीने कार्यक्षेत्रातील २०२ गावांपैकी ७६ गावात ऊस सर्व्हे पूर्ण केला आहे. खादर भागातील तीन गावांमध्ये, शाहपूर सुल्तानपूर (टिकोला कारखाना), अकसरीपूर आणि इब्राहिमपूर (सिंभावली कारखाना) ऊस लागवड नसल्याचे सांगण्यात आले. उर्वरीत गावातील सर्व्हेच्या कामाला गती देण्यात आली आहे. मवाना साखर कारखान्याचे ओमवीर सिंह, समितीचे कर्मचारी शिशुपाल सिंह यांनी हा सर्व्हे केला आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गणेशपूर गावात शेतकरी ब्रह्मपाल आणि त्याच्या भावांच्या शेतात आणि अभयराम यांच्या शेतातील उसाची पाहणी करण्यात आली. सर्व्हेमध्ये नोंदवलेले ऊस क्षेत्र अचूक असल्याचे आढळून आले. ऊस विकास परिषदेचे वरिष्ठ निरीक्षक सौबिर सिंह यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना लगेच स्लीप देण्यात येत आहे. ऑनलाइन घोषणापत्र विभागीय पार्टलवर भरावे आणि समितीचे नवीन सदस्यत्व घ्यावे याची माहिती दिली जात आहे. उसावरील टॉप बोरर किड रोग व इतर अडचणींबद्दल समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. सर्व्हे १५ जूनपर्यंत पूर्ण होईल याची खबरदारी घेण्याचे आदेश सर्वेक्षण करणाऱ्या टीमला देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here