ऊस दराबाबत शेतकरी संघटना, कारखाना प्रतिनिधींची बैठक निष्फळ

पुणे : ऊस दराबाबत शेतकरी संघटना आणि साखर कारखान्याच्या प्रतिनिधींची साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी बोलावलेली बैठक निष्फळ ठरली. कारखानदारांनी ऊस दराची घोषणा करण्यापूर्वी गाळप सुरू केल्याने स्वाभीमानी शेतकरी संघटना आणि सांगली, सातारा जिल्ह्यातील इतर संघटना संतप्त झाल्या आहेत. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी एकरकमी एफआरपीची मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी आधीच एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा केली आहे.

टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृ्त्तानुसार, पुण्यात झालेल्या बैठकीस उपस्थित असलेले स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी सांगतिले की, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील तुरळक कारखाने वगळता इतरांनी दराची घोषणा केलेली नाही. मात्र, गाळप सुरू करण्यात आली आहे. कायद्यानुसार कारखानदारांनी शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर देणे अनिवार्य आहे. मात्र, अनेक कारखान्यांनी दराची घोषणा केलेली नाही. त्यामुळे ते कमी दर देऊ शकतात.

आता शेतकरी संघटनांकडून ऊस वाहतुकीत अडथळे आणले जात आहेत. पुण्यातील बैठक निष्फळ ठरल्याने संघटनांची आंदोलने वेगावण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

खराडे यांनी सांगितले की आम्ही स्थानिक कामगारांसोबत बैठक घेऊ. आंदोलन सर्व कारखान्यापर्यंत पोहोचवले जाईल. कारखानदारांना ऊस तोडण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here