ऊस थकबाकीच्या मुद्द्यावरुन शेतकर्‍यांनी घेतली एसडीए यांची भेट

मोदीनगर : राष्ट्रीय लोकदलाच्या बॅनरखाली सोमवारी शेतकर्‍यांनी ऊस थकबाकी भागवण्याची मागणी केली. त्यांनी मोदीनगरचे एसडीएम आदित्य प्रजापति यांना निवेदन दिले. एसडीएम यांनी त्यांच्या समस्या ऐकल्या आणि त्यांची मागणी उच्च अधिकार्‍यांपर्यंत पोचवण्याचे आश्‍वासन दिले.

सोमवारी सकाळी मोठ्या संख्येने शेतकरी तहसील कार्यालयात आले. तिथे त्यांनी एसडीएम यांना सांगितले की, कोरोना काळात शेतकरी आर्थिक संकटात आहेत. शेतकर्‍यांजवळ घरखर्च चालवण्यासाठी ही पैसे नाहीत. पण साखर कारखान्याकडून ऊस थकबाकी अजूनही भागवण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत जर ऊसाचे पैसे मिळाले, तर शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळेल. पण याकडे कारखान्याचे लक्ष नाही. कारखान्याकडून अजून व्याजही भागवण्यात आलेले नाही. प्रत्येक वेळी तक्रार केल्यावर केवळ आश्‍वासनच मिळते. समस्या मात्र सुटत नाही. शेतकर्‍यांची ही स्थिती पाहता लवकरात लवकर ऊस थकबाकी भागवावी. यावेळी अरुण दहिया, प्रवीण, दीपक, सतपाल सिंह, ललित सैन, रामभरोसे लाल, कपिल चौधऱी, अजित सिंह, अनिल, दीपक आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here