मुंबईत आज ऊस गाळपबाबत मंत्री समितीची बैठक

105

पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. १३ सप्टेंबर) मुंबईमध्ये २०२१-२२ या हंगामातील ऊस गाळपाचे धोरण ठरविणारी महत्त्वपूर्ण मंत्री समितीची बैठक होणार आहे. यंदा महाराष्ट्रात ऊसाचे उच्चांकी १ लाख ९६ लाख मेट्रिक टन गाळप होईल असा अंदाज आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम १५ ऑक्टोबरपासून की एक नोव्हेंबरपासून याबाबतचा निर्णय बैठकीत घेतला जाईल.

पुढारी मध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, साखर संघाचे प्रतिनिधी, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह इतर मंत्री, साखर आयुक्त शेखर गायकवाड आदींच्या उपस्थितीत ही बैठक होईल. राज्यात यंदा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करावा, उसाची उपलब्धता जादा आहे असे साखर कारखानदारांचे म्हणणे आहे. दुसरीकडे हंगाम पूर्वीप्रमाणे १ नोव्हेंबरपासूनच सुरू करावा. लवकर सुरू झाल्यास उसाचा उतारा कमी पडतो असेही काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे हंगामाची निश्चिती करण्यासाठी या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. तसेच ऊसाच्या गाळपाबाबतचे नियोजन केले जाणार आहे.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here