राज्यातील साखर उद्योगाच्या समस्यांवर आज विधान भवनात बैठक

पुणे: साखर कारखान्यांची अर्थिक स्थिती, ऊसाची कमी उपलब्धता आणि कर्जांचे पुनर्गठन अशा महत्वाच्या प्रश्‍नांबाबत चर्चा करण्यासाठी आज विधानभवनात विधन परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह संबंधितांची बैठक बोलावली आहे.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार जयंत पाटील व इतर विधान परिषद सदस्यांनी यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे ऊस पिकावर परिणाम झाल्याने ऊस उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होणे, या विषयावर अल्पकालीलन चर्चा उपस्थित केली होती. त्याला अनुसरुन होणार्‍या या बैठकीत कोणता निर्णय घेतला जाणार याकडे साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आम. जयंत पाटील, प्रसाद लाड, बाळाराम पाटील, श्रीकांत देशपांडे आदी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

राज्य सहकारी बँकेप्रमाणेच राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनीही सहकारी साखर कारखान्यांना कर्ज पुरवठा केलेला आहे. नियांमचे पालन करीत आणि तत्कालीन मुख्यमंत्री व मंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकांन्वये कारखान्यांना वित्त पुरवठा करण्यात आला. मात्र कारखान्यांनी आता कर्ज थकविल्याने त्याचा परिणाम संबंधित जिल्हा बँकांच्या वार्षिक ताळेबंदावर होत आहे. त्यांना तशी अनुत्पादक कर्जाची तरतूद करावी लागते. त्यामुळे कर्जांचे पुनर्गठन या मुद्द्यावर अधिक चर्चा अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here