ऊस दरासाठी कारखानदारांची उद्या कोल्हापुरात बैठक

539

कोल्हापूर, दि. 9 : राज्यात आता ऊस दर किती मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे नुकसान टाळण्यासाठी यंदा प्रथमच जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी कारखाने स्वत:हून बंद केले होते. यामुळे तोडणी यंत्रणा जागेवर स्तब्ध झाली होती. मजूर बसून असल्याचा दबावही कारखान्याच्या यंत्रणेवर आहे.
कारखाने जास्त काळ बंद ठेवणे परवडत नसल्याने कारखानदारांनी या प्रश्‍नी चर्चा करण्यासाठी उद्या (शनिवारी) पुन्हा बैठक बोलावली आहे. या बैठकीत कारखानदार हंगाम कधी सुरु करायचा, पहिला हप्ता कीती द्यावा, तो कसा दिला तर परवडेल याबाबत चर्चा होणार आहे. ही बैठक कारखानदारांनी बोलाविली असली तरी कारखाना प्रतिनिधींना केवळ बैठकीस उपस्थित रहाण्याबाबतच कळविण्यात आले आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here