मेघालय : बीएसएफ आणि पोलिसांनी जप्त केली १९ हजार किलो साखर

शिलाँग :सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मेघालय फ्रंटियर आणि मेघालय पोलिसांनी संयुक्त मोहिमेत दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यातील रोंगरा विभागात तस्करी करण्यात येत असलेली १९,००० किलोहून अधिक साखर जप्त केली.

सूत्रांकडून मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारावर बीएसएफ आणि मेघालय पोलिसांच्या जवानांनी आंतरराष्ट्रीय सीमेजवळ ही तपासणी मोहिम राबवली. यामध्ये त्याना एका रिकाम्या असलेल्या घरात मोठ्या प्रमाणात साखर ठेवलेली आढळली. ही साखर कथितरित्या बांगलादेशमध्ये तस्करी करण्यात येणार होती. जप्त करण्यात आलेली साखर नंतर पुढील तपासणी आणि कायदेशीर कारवाईसाठी रोंगरा पोलिस स्टेशनकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here