मेघालय: बांगलादेशमध्ये तस्करी केली जाणारी साखर जप्त

मेघालय बीएसएफने मंगळवारी रात्री ११ भारतीय नागरिकांना अटक केली आहे. ते बांगलादेशमध्ये २२,००० किलो साखर तस्करी करण्याच्या प्रयत्नात होते.

बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. काल रात्री मेघालयातील ०४ बीएन बीएसएफच्या सदस्यांनी सतर्कता दाखवत ११ भारतीय नागरिकांना अटक केली आहे. हे नागरिक आपल्या गाड्यांमधून ११,००० किलोपेक्षा अधिक साखर बांगलादेशमध्ये तस्करी करण्यासाठी घेवून जात होते.

बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमलारेम सीमेवर साखर पोहोचवली जाते. त्यापूर्वी मुक्तापूर विभागात तस्करी करताना बीएसएफने या गाड्यांना रोखले, अटक केलेल्या लोकांनी कोणतीही कागदपत्रे दाखवलेली नाहीत. बीएसएफच्या चौकशीतही समाधानकारक माहिती दिलेली नाही. त्यानंतर बीएसएफद्वारे सर्व वाहने जप्त करण्यात आली. आणि त्यांना पुढील कारवाईसाठी दौकी कस्टम कार्यालयाकडे सोपविण्यात आले आहे.

बीएसएफ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑक्टोबर २०२२ पासून आतापर्यंत बीएसएफने मेघालयाच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरुन तस्करी केली जाणारी ३ लाख किलो साखर जप्त केली आहे. साखरेची वाढती मागणी आणि बांगलादेशातील किमतीत वाढ यामुळे तस्करी वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here