Global Biofuels Alliance चे सदस्यत्व २२ जुलै रोजी खुले होणार : हरदीप सिंह पुरी

अमेरिका, ब्राझील आणि भारताचे पाठबळ असलेल्या जागतिक जैवइंधन महाआघाडी /ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स (Global Biofuels Alliance/GBA) साठी २२ जुलै रोजी गोवामध्ये G२० च्या Energy Transition Ministerial Meeting (ETMM) यांदरम्यान, इतर देशांसाठी सदस्यत्व खुले केले जाणार आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सातत्यपूर्ण विकासाचे लक्ष्य आणि जैव इंधनावर हिंदूस्थान टाइम्समधील कार्यक्रमात सांगितले की, २२ जुलै रोजी गोव्यामध्ये जी २० स्वच्छ ऊर्जा मंत्रिस्तरीय बैठकीवेळी Global Biofuels Alliance ची घोषणा होईल. GBA ला ब्राझील आणि अमेरिकेचे पाठबळ भारताच्या G20 अध्यक्षते अंतर्गत मिळत आहे. जैव इंधन स्वीकारण्यासाठी जागतिक सहकार्य आणि जैव इंधनामधील भागिदारी वाढवणे, त्याच्या विकासासाठी जागतिक सर्वोत्तम पद्धती ओळखण्याच्या दिशेने काम केले जाणार आहे.

उद्दिष्टाच्या पाच महिने आधी १० टक्के इथेनॉल मिश्रण गाठण्याच्या आधारावर केंद्राने २०२५ मध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण (E२०) मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पुरी म्हणाले की, त्याच्या वापराशी संबंधित ऑटोमोबाईल मिश्रित इंधनाचा पर्याय मिळाला आहे. देशात जवळपास १,३५० पेट्रोल पंप आधीच E२० ईंधन विक्री करीत आहेत. मंत्र्यांनी सांगितले की, सरकारने मे महिन्यात पुणे ते दिल्ली उड्डाणासाठी १ टक्का स्वदेशी टिकाऊ विमान इंधनाचा (sustainable aviation fuel) वापर करण्याच्या अनुभावाच्या आधारावर १ टक्के मिश्रीत विमान इंधनाच्या एका धोरणावरही काम केले जात आहे.
मंत्री म्हणाले की, २०१४ मध्ये सरकारने २०२२ पर्यंत १० टक्के मिश्रण आणि २०३० पर्यंत २० टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवले होते. आम्ही २०२२ मध्ये, उद्दिष्टाच्या ५ महिने आधीच १० टक्के मिश्रण प्राप्त केले आहे. आता २०३० चे उद्दिष्ट २०२५ वर आणले आहे. आमच्याकडे देशात १३५० पेट्रोल पंप आहेत. तेथे ई २० इंधनाची विक्री गतीने सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here