गुजरातमध्ये हवामान विभागाचा इशारा, आठवडाभर जोरदार पाऊस बरसणार

नवी दिल्ली : गुजरातमध्ये १६ सप्टेंबरपर्यंत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. बंगालच्या खाडीत आणि अरबी समुद्रातील बदलत्या स्थितीमुळे आगामी आठवड्यात दक्षिण-पश्चिम मान्सून सक्रिय होण्याची अपेक्षा आहे. आयएमडीने सांगितले की, मान्सून ट्रफ अहमदाबाद, ब्रह्मपुरी, जगदलपूर, ओडिशाची दक्षिण किनारपट्टी आणि मध्य तसेच पूर्व आणि दक्षिण-पूर्वेच्या दिशेने बंगालच्या खाडीवरून जाते. याशिवाय दक्षिण महाराष्ट्र-गोव्याच्या किनारपट्टीपासून मध्य अरबी समुद्रावर चक्रीय वाताची स्थिती आहे.

एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी सायंकाळपर्यंत गुजरातच्या ७५ तालुक्यांमध्ये पाऊस नोंदवला गेला. वडोदरा, सुरत, उमरपाडा यासह सुबीर, सिनोर, मेहसाणामधील जोताना, दादोह येथे जोरदार पाऊस झाला आहे. अहमदाबाद शहराच्या काही भागातही जोरदार पाऊस कोसळला. आज, सोमवारी सौराष्ट्रातील राजकोट आणि मोरबी जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. याशिवाय खेडा, मेहसाणा, बनासकाठा, आनंद, नर्मदा, भरूच सुरत, नवसारी, वलसाड, तापी आणि जामनगर, पोरबंदर, जुनागढ, अमरेली, द्वारका यासोबकच गिर सोमनाथ जिल्ह्यात मोठ्या पावसाची शक्यता आहे. आयएमडीने १४ सप्टेंबर रोजी वडोदरा, छोटा उदयपूरसह सौराष्ट्रातही पाऊस हजेरी लावेल असे अनुमान वर्तविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here