मेक्सिकोत ६२ लाख टन साखर उत्पादनाची अपेक्षा

मेक्सिको सिटी : चीनी मंडी

मेक्सिकोच्या शाश्वत ऊस विकास विभागाच्या राष्ट्रीय कमिटीने साखर उत्पादनाबाबत पहिला अंदाज व्यक्त केला आहे. त्यात मेक्सिकोमधील साखर उत्पादन २०१८-१९च्या हंगामात ६२ लाख ५० हजार टन पर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. झाफराने या वेबसाईटने ही माहिती दिली.

कमिटीच्या अहवालामध्ये म्हटले आहे की, मेक्सिकोमध्ये २०१८-१९च्या हंगामासाठी ५१ कारखाने सुरू राहतील. नोव्हेंबरपासून हा हंगाम सुरू होत आहे. देशातील ८ लाख २२ हजार ९२५ हेक्टर क्षेत्रातून ५५० लाख टनाहून अधिक ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे.

यामध्ये प्रति हेक्टर ६७.८ टन ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अर्थात या आकडेवारीमध्ये हंगामात बदलही होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मेक्सिकोमधील टोबॅस्को प्रांतातील ऊस उत्पादक मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे चिंतेत आहेत. कारण, आगामी हंगामातील उसावर दुष्काळी परिस्थितीचापरिणाम होणार आहे.

स्थानिक ऊस उत्पादक संघटनेचे नेते रोबेर्तो म्हणाले, शेतकऱ्यांसाठी पुढचा हंगाम अतिशय अवघड असणार आहे. साखरेला प्रति टन ५९१ अमेरिकी डॉलर दर मिलत आहे. मुळात साखरेला मिळणारा दर, ही समस्या नाही, तर पुढच्या हंगामात उत्पादन कमी होणार हाच चिंतेचा विषय आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here