मंगळवेढा : आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षांपासून आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज प्रा.लि. नंदर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून दोन गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. चालू गळीत हंगाम सर्वांनी मिळून यशस्वीपणे पार पाडावा असे आवाहन विष्णुपंत आवताडे यांनी केले. श्री. संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जेष्ठ मार्गदर्शक विष्णुपंत बाबूराव आवताडे यांच्या हस्ते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये आवताडे उद्योग समूह संचलित आवताडे शुगर अँड डिस्टीलरीजमध्ये नव्या गळीत हंगामासाठी रोलर पूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, कार्यकारी संचालक मोहन पिसे, भारत निकम, टेक्निकल सरव्यवस्थापक सुहा शिनगारे, चीफ केमिस्ट मोहन पवार, एच. आर. मॅनेजर ज्ञानेश्वर बळवंतराव, डिस्टिलरी मॅनेजर संभाजी फाळके, चिफ अकाउंटंट बजरंग जाधव, शेती अधिकारी राहुल नागणे, उपशेती अधिकारी तोहीद शेख, ऊस पुरवठा अधिकारी दामोदर रेवे, डे. चिफ इंजिनिअर प्रताप मोरे, डे. चीफ केमिस्ट सोमनाथ ढावरे, स्टोअर किपर महेश इंगळे, पर्चेस मॅनेजर अजित सरवळे, सुरक्षा अधिकारी चंद्रकांत राठोड, सहा. सुरक्षा अधिकारी रणजीत पवार आदी उपस्थित होते.