गळीत हंगाम २०२१-२२ : उत्तर प्रदेशमध्ये ९२ साखर कारखाने सुरू

उत्तर प्रदेशमध्ये सध्याच्या गळीत हंगामातील ऊस बिले त्वरीत दिली जावीत यासाठी साखर कारखान्यांना कडक निर्देश दिले आहेत. तसेच नियमीत आढावाही घेतला जात असल्याची माहिती ऊस तथा साखर आयुक्त संजय आर. भुसरेड्डी यांनी दिली. तातडीने ऊस बिले अदा करण्याच्या प्रक्रियेत २०२१-२२ या हंगामातील देय ५१०.२० कोटी रुपयांच्या तुलनेत ५५३.२६ कोटी रुपयांची बिल शेतकऱ्यांना देण्यात आली आहेत. मूळ ऊस दरापेक्षा ती ४३.०६ कोटी रुपयांनी अधिक आहेत. नव्या हंगामाच्या पहिल्या टप्प्यात तसेच सणांच्या कालावधीत त्वरीत ऊस बिले अदा करण्याच्या प्रक्रियेने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाविषयी माहिती देताना भूसरेड्डी यांनी सांगितले की, सध्याच्या गळीत हंगामा २०२१-२२ या अंतर्गत आतापर्यंत ९२ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये महामंडळ क्षेत्रातील १, सहकारी क्षेत्रातील १७ तथा खासगी क्षेत्रातील ७४ कारखान्यांचा समावेश आहे. महामंडळ क्षेत्रातील मोहद्दीनपूर तथा सहकारी क्षेत्रातील ननौता, सरसावा, मोरना, बागपत, रमाला, अनूपशहर, स्नेहरोड, गजरौला, सेमीखेड़ा, विसलपूर, पूरनपूर, तिलहर, पुवांया, बदायूँ, कायमगंज, बेलराया तथा नानपारा या साखर कारखान्यांचा समावेश आहे.

खासगी क्षेत्रातील कारखान्यांमध्ये मोदी समुह, यदू ग्रुपचे प्रत्येकी २, डीसीएम श्रीराम समुह, वेव्ह ग्रुपचे प्रत्येकी ४, मवाना समुहाचे २, राणा समुहाचे ४, उत्तम समुह, द्वारकेश ग्रुप आणि दालमिया ग्रुपचे प्रत्येकी ३, त्रिवेणी समुहाचे सात, धामपूर ग्रुपचे ५ आदींचा समावेश आहे. तर इतर १३ कारखान्यांनीही गाळप सुरू केले आहे. यामध्ये सिंभावली समुहाच्या तीनपैकी दोन, बजाज समुहाच्या १४ पैकी नऊ, बलरामपूर समुहाच्या १० पैकी ५, आयपीएल समुहाच्या ६ पैकी ३, बिर्ला समुहाचे ४ पैकी ३ कारखान्यांचा समावेश आहे. अन्य १७ कारखान्यांनी गाळपाबाबतची प्रक्रिया पूर्ण करत आणली असून ऊस खरेदीसाठी इंडेंट जारी केले आहे. दोन ते तीन दिवसांत हे कारखाने सुरू होतील. उर्वरीत ११ कारखानेही लवकरच सुरू होणार आहेत.

ऊस आयुक्तांनी सांगितले की, चालू गळीत हंगामात हरदोई जिल्ह्यातील हरियावा, लोणी तसेच रुपापूर, लखीमपूरची अजबापूर, गुलरिया तसेच कुंभी, बिजनौरची स्योहारा, धामपूर, बहादुरपूर, बुंदकी आणि बरकतपूर, सितापूरची रामगड, हरगाव, जवाहरपूर, मेरठ जिल्ह्यातील मवाना, नंगलामल, दौराला, संभलची असमौली, पिलभीतची पिलभीत, शाहजहाँपूरची निगोही, रोजा, मुझफ्फरनगरची मन्सूरपूर आणि टिकौला, बरेलीची मीरजंग, फरीदपूर, बदायूँची बिसौली तसेच मुरादाबादच्या बिलारी कारखान्याचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here