नवी दिल्ली : चालू वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत सुट्या भागांचे उत्पादन करणाऱ्या उद्योगातील तब्बल एक लाख कंत्राटी कामगारांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना वाहन उद्योग क्षेत्रातील मंदीचा प्रामुख्याने फटका बसला असल्याचे ऑटोमोटिव्ह कॉम्पोनण्ट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (एसीएमए) अध्यक्ष दीपक जैन यांनी सांगितले.
सणासुदीच्या दिवसांमुळे ऑक्टोबरचा अपवाद वगळता बहुतांश कंपन्यांच्या विक्रीत कमालीची घट झाली आहे. याची थेट झळ सुट्या भागांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना बसली आहे. मारुती सुझुकीसह अनेक कंपन्यांनी उत्पादनामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ही ,सुट्या भागांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या हतबल झाल्या असून, त्यांनी कामगार कपात करण्याचे ठरवले आहे. आता लाख भर कामगार बेरोजगार होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. वाहन उद्योग क्षेत्रास गेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीने ग्रासले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.