कोरोनामुळे नुकसान होवूनही साखर व्यापाराला गती देण्यासाठी साखर उद्योग गंभीर

नवी दिल्ली : साखर उद्योग भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, जो ग्रामीण भारतामध्ये ऊस शेतकर्‍यांचे उत्पन्न आणि स्थानिक कामगारांसाठी रोजगाराचे मोठे माध्यम आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोना च्या वैश्‍विक महामाहारीमुळे ऊस उत्पादन आणि साखरेच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. भारतासारख्या मोठया ऊस उत्पादक देशात साखरेचा व्यापार आणि कारभारावर कारोनाचा परिणाम दिसत आहे. याबाबत बोलताना डीसीएम श्रीराम चे प्रमुख निदेशक रोशन लाला तमक यांनी सांगितले की, सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे पण कठीण नाही. साखर उद्योजकांच्या समोर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी हे एक आव्हान आहे. या आव्हानाशी झुंजण्यासाठी आम्ही पूर्ण तयारीनीशी काम करत आहोत. तमक यांनी सांगितले की, आता ऊस गाळप सुरु आहे. गेल्या वर्षी आम्ही 548 लाख क्विंटल ऊस गाळप केले होते. यावर्षी 600 लाख क्विंटल ऊस गाळप करण्यासाठी तयार आहे. 10 मे पर्यंत गाळप हंगाम संपल्यानंतर स्थिती स्पष्ट होईल. यावर्षी गेल्या वर्षापेक्षा अधिक साखर उत्पादन टार्गेटसह सुरु आहे. यावर्षी 66 लाख क्विंटल साखर उत्पादनाचा अंदाज आहे. गेल्या हंगामात आम्ही 65.82 लाख क्विंटल साखर उत्पादन केले होते.

जेव्हा त्यांच्याशी साखर निर्यातीबाबात चर्चा केली तेव्हा ते म्हणाले होते की, साखरेच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे, पण ऑर्डर देखील मिळत आहेत. पुढे आणखीही ऑर्डर्स मिळणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजारातील गती कमी आहे पण येणार्‍या दिवसांमध्ये गती येईल. वैश्‍विक बाजारातील स्थिती लक्षात घेत आम्ही चालत आहोत. सध्या भारतातून साखरेची काही देशात निर्यात होत आहे आणि इंडोनेशिया व ईराण सारख्या देशांमध्ये निर्यातीचे काम सुरु आहे.

रोशन लाल टमक यांनी सांगितले आहे की, यूपीमध्ये आमचे चार साखर कारखाने आहेत. गेल्या वर्षी आम्ही 12 लाख टन साखरेची निर्यात केली होती. यावेंळीही चांगले टार्गेट घेतले आहे. सकारात्मक विचारांसह यावेळी आमचे प्रयत्न सुरु आहेत. अंदाज आहे की, स्थिती सामान्य होईल आणि साखरेचा उद्योगाला कोरोनामुळे झालेल्या नुकसानातून तारुन देशाला आर्थिक उंचीवर घेवून जाण्याचे काम केले जाईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here