फ्लेक्स-फ्युएल इंजिनबाबत लवकरच निर्णयाची मंत्री गडकरींची माहिती

नवी दिल्ली : सरकार पुढील ८-१० दिवसांमध्ये फ्लेक्स फ्युएल इंजिनबाबत निर्णय घेईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. अशा प्रकारचे इंजीन ऑटोमोबाईल उद्योगासाठी अनिवार्य करण्याबाबत सरकारचा विचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या उपाययोजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल आणि भारतीय अर्थव्यवस्थेलाही चालना मिळू शकेल.

रोटरी डिस्ट्रीक्ट कॉन्फरन्स २०२०-२१ मध्ये बोलताना गडकरी म्हणाले, इथेनॉलची किंमत ६० ते ६२ रुपये प्रती लिटर आहे. तर पेट्रोलचा दर देशाच्या अनेक भागात १०० रुपये प्रती लिटरपेक्षा अधिक आहे. त्यामुळे इथेनॉलचा उपयोग करून ३०-३५ रुपयांची बचत होईल. ऑटोमोबाईल उद्योगाबाबत एक आदेश जारी करण्यात येणार आहे. त्यानुसार गाड्यांमध्ये फक्त पेट्रोल इंजिन नसेल तर फ्लेक्स इंधनावरील इंजिनही असेल. लोकांना शंभर टक्के पेट्रोल अथवा शंभर टक्के इथेनॉल वापराची मुभा राहील. मी पुढील ८-१० दिवसांमध्ये याबाबत निर्णय घेणार आहे. आम्ही फ्लेक्स-फ्यूएल इंजिन ऑटोमोबाईल उद्योगाला अनिवार्य करणार आहोत.

मंत्री गडकरी म्हणाले, ऑटोमोबाईल उत्पादक ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत फ्लेक्स – फ्यूएल इंजिनाचे उत्पादन करीत आहेत. त्यातून ग्राहकांना १०० टक्के पेट्रोल अथवा १०० टक्के बायो इथेनॉलचा वापर करण्याचा पर्याय उपलब्ध होतो.

अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रदूषणावर उपाय म्हणून तसेच आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे उद्दीष्ट पाच वर्षांनी घटवू २०२५ करण्यात आले. सरकारने गेल्यावर्षी, २०२२ पर्यंत पेट्रोलमध्ये १० टक्के आणि २०३० पर्यंत २० टक्के उद्दीष्ट निश्चित केले होते. गडकरी म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत पेट्रोलमध्ये ८.५ टक्के इथेनॉल मिश्रण केले जाते. २०१४ मध्ये फक्त १ ते १.५ टक्के इथेनॉल मिश्रण केले जात होते. इथेनॉलची खरेदी ३८ कोटी लिटरवरून ३२० कोटी लिटरवर पोहोचली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here