साखर उत्पादन घटवून त्याचे इथेनॉलमध्ये रुपांतर करा, साखर उद्योगाच्या भल्यासाठी याची गरज : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी साखर कारखान्यांनी बदलत्या काळातील वास्तव आणि देशाच्या गरजेनुसार साखरेचे इथेनॉलमध्ये रुपांतर करावे असे आवाहन केले. जर साखरेचे उत्पादन असेच वाढत राहिले, तर आगामी काळात ही बाब उद्योगासाठी हानीकारक असेल असा इशारा गडकरी यांनी साखर आणि संबंधित उद्योगांतील नेत्यांना दिला. देशात तांदूळ, मक्का, साखर या गोष्टी अतिरिक्त आहेत, याची आठवण करून देत गडकरी यांनी सांगितले की, आपल्या भविष्यासाठी साखरेचे उत्पादन घटवणे आणि इथेनॉलचे उत्पादन वाढवणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे.

श्री. गडकरी आज, २० मार्च २०२२ रोजी मुंबईत साखर आणि इथेनॉल भारत परिषद (एसईआयसी) २०२२ मध्ये बोलत होते. साखर आणि संबंधित उद्योगांसाठीच्या बातम्या तसेच माहिती पुरवणाऱ्या चीनीमंडी या पोर्टलद्वारे आयोजित, परिषदेत देशांतर्गत आणि जागतिक साखर व्यापारातील सर्वोच्च आव्हाने आणि जोखीम प्रतिसाद धोरणे, भारताच्या साखर उद्योग, इथेनॉल क्षेत्र तयार करण्यासाठी भविष्यातील योजना यांबाबत चर्चा करण्यात आली. देशांतर्गत आणि जागतिक उद्योगातील नामवंत तज्ज्ञांना एकत्र आणण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली.

इथेनॉलचे उत्कृष्ट अर्थशास्त्र
गडकरी यांनी कशा प्रकारे इथेनॉलचे अर्थशास्त्र डिझेल अथवा पेट्रोलद्वारे संचलित वाहनांसाठी उत्कृष्ट आहे याची माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही फ्लेक्स इंजिनवर चर्चा करीत आहोत. टोयाटो, ह्युंदाई, सुझुकीने पुढील सहा महिन्यांत फ्लेक्स इंजिन आणण्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही ग्रीन हायड्रोजनवर चालणारी पायलट कार लाँच केली आहे. टोयाटोच्या अध्यक्षांनी सांगितले की, त्यांची कार फ्लेक्स आहे. पूर्णपणे पेट्रोल अथवा १०० टक्के इथेनॉल. आगामी काही काळात टोयाटो कार्स हायब्रीड विजेवर चालतील. ४० टक्के विजेचे उत्पादन केले जाईल. तथा १०० टक्के इथेनॉलचा वापर केला जाईल. पेट्रोलच्या तुलनेत ही आर्थिक उपाययोजना लाभदायी असेल.

गडकरी यांनी सांगितले की, केंद्र सरकारने नागरिकांना इथेनॉल भरण्यासाठी जैव इंधनाचे आउटलेट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कार, स्कूटर, मोटारसायकल, रिक्षा फ्लेक्स इंजिनीमध्ये उपलब्ध होतील. पंतप्रधानांनी पुण्यात तीन इथेनॉल पंपांचे उद्घाटन केले. मात्र, आतापर्यंत कोणीही इथेनॉल भरण्यास आलेले नाही. बजाज, टीव्हीएस आणि हिरोने फ्लेक्स इंजिनीने चालणाऱ्या मोटारसायकल लाँच केल्या आहेत. फ्लेक्स इंजिनवर स्कूटर, मोटारसायकल उपलब्ध आहेत. ते इथेनॉलवर धावणाऱ्या ऑटो रिक्षाही लाँच करण्यास तयार आहेत.

गडकरी यांनी इथेनॉलचे उत्पादन करणाऱ्या सर्व साखर कारखान्यांना आपल्या कारखाना तसेच परिसरात इथेनॉल पंप सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले. ते म्हणाले, यातून १०० टक्के स्कूटर, ऑटो रिक्षा, कार इथेनॉलवर चालतील. अशा प्रकारे इथेनॉलच्या वापरात वाढ होईल. प्रदूषण घटू शकेल. आयात कमी होईल. आणि गावातील लोकांना रोजगारही मिळेल.

इथेनॉलसाठी निश्चितपणे मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल
गडकरी यांनी आश्वासन दिले की, इथेनॉलसाठी पुरेशी मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल की नाही याची चिंता करण्याची गरज नाही. ते म्हणाले, इथेनॉल हे हरित, स्वच्छ इंधन आहे. आम्ही सध्या ४६५ कोटी लिटरचे उत्पादन करीत आहोत. मात्र, जर ई २० कार्यक्रम पूर्ण झाला तर आपली गरज १५०० कोटी लिटरची असेल. याशिवाय अतिरिक्त आगामी पाच वर्षात जेव्हा फ्लेक्स इंजिन तयार होतील, तेव्हा इथेनॉलची गरज ४००० कोटी रुपयापर्यंत पोहोचेल. त्यामुळे जर तुम्ही इथेनॉलमध्ये बदलणार नसाल आणि साखरेचे उत्पाद सुरू ठेवणार असाल, तर कारखाना तोट्यात जाईल. एक व्यवहार्य पर्याय म्हणून उसाच्या रसाचे सीरप आणि त्यापासून इथेनॉल उत्पादन करता येईल.

गडकरी म्हणाले की, प्रत्येक कारखान्याने बी हेवी मोलॅसीसचा वापर केला पाहिजे. भारताने डिसेंबर २०२३ नंतर साखर निर्यात अनुदान बंद करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आपल्या सर्व कारखान्यांनी बी हेवी मोलॅसीसचा वापर केला पाहिजे. साखर उत्पादन घटविल्यास आपल्याला साखरेचा योग्य दर मिळू शकेल. सरकारने बी हेवी मोलॅसीससाठी २४५ कोटी लिटर आरक्षित केले आहेत. मात्र, केवळ ५५ कोटी लिटर अथवा २२ टक्के पुरवठा करण्यात आला. यातून दिसलेला फरक महत्त्वपूर्ण आहे. यातून सर्व साखर कारखान्यांना वाचवले जाऊ शकते. इथेनॉलमुळे आमची अर्थव्यवस्थाही सुधारेल. सी हेवी मोलॅसिस दूर सारून उद्योगांनी खराब तांदळापासून इथेनॉल उत्पादन करण्याचा विचार केला पाहिजे.

गडकरी यांनी सांगितले की, रस्ते निर्मिती उपकरणात फ्लेक्स इंजिनचा वापर इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची संधी आहे. ते म्हणाले, रस्ते निरिती उपकरणाच्या उत्पादनात ८० टक्के वाढ झाली आहे. मी त्यांना डिझेल इंजिनचा वापर बंद करणे आणि फ्लेक्स इंजिनमध्ये त्याचे रुपांतर करण्यास सांगितले आहे. त्यातून इथेनॉल वापरास प्रोत्साहन मिळू शकते. गडकरी यांनी सागितले की, ब्राझीलकडून इथेनॉलपासून बायोडिग्रेडेबल प्लास्टिकही बनविण्यात आले आहे. भारतातही आपण असा प्रयोग करू शकतो.

विमान वाहतूक क्षेत्रात इथेनॉलचा अधिक वापर होईल
गडकरी यांनी सांगितले की सरकार विमान वाहतूक आणि भारतीय वायू सेनेत इथेनॉलचा वापर वाढविण्याच्या पद्धतींवर विचार करत आहे. ते म्हणाले, विमान वाहतूक क्षेत्रात इथेनॉलचा वापर कशा प्रकारे केला जाऊ शकतो याचा मी विचार करीत आहे. दोन वर्षापूर्वी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेणाऱ्या फायटर जेट्समध्ये १०० टक्के बायो इथेनॉलचा वापर करण्यात आला होता. मी वायूसेना आणि संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करीत आहे. विमान वाहतूक आणि भारतीय वायू सेनेत इथेनॉलचा वापर कसा वाढवता येईल यावर आम्ही विचार करीत आहोत. आम्ही ४ लाख दूरसंचार मोबाईल टॉवर्ससाठीही इथेनॉलाच वापर करण्यावर विचार करू शकतो.

इथेनॉल: आयात-प्रतिस्थापन, किफायतशीर, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी उपाय
भारताच्या साखर उद्योगासमोर साखरेचा वापर कमी करणे आणि साखरेचे रुपांतर इथेनॉलमध्ये करण्याशिवाय इतर कोणताही पर्याय शिल्लक नसल्याचे गडकरी यांनी सांगितले. आम्ही या दिशेने गतीने पुढे गेले पाहिजे असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, आम्ही हरित क्रांतीच्या दिशेने जाण्याची गरज आहे. त्यासाठी आम्हाला इथेनॉलचे उत्पादन वाढविण्याची गरज आहे. गडकरी यांनी सांगितले की, आपल्या देशातील एकूण पेट्रोलियम आयात ८ लाख कोटी रुपयांची आहे. ही आयात पुढील ५ वर्षात २५ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. २५ लाख कोटी रुपयांच्या पेट्रोलियम पदार्थांची आयात केल्या आर्थिक समस्या निर्माण होणार आहेत. त्यातून अतिरिक्त, अधिक प्रमाणात जिवाश्म इंधन आल्याने नव्या समस्या निर्माण होतील. त्यामुळे गडकरी यांनी आयात कमी करणे, प्रदूषण मुक्ती, खर्चात कपात यांसह स्वदेशी पर्याय स्वीकारण्याची गरज असल्याचे सांगत इथेनॉल आणि हरित इंधनाच्या वापरावर भर दिला.

II. भारताने ऊर्जा निर्यातदार देश बनावे, शेतकरी वीज पुरवठादार बनण्याची गरज
गडकरी यांनी स्पष्ट शब्दात हरित इंधनाचे रुपांतरण आणि कृषी क्षेत्रासाठी ऊर्जा तसेच विजेच्या क्षेत्रात विविधता आणण्याची गरज मांडली. ते म्हणाले, “इथेनॉल, मिथेनॉल, बायो इथेनॉल, बायो-सीएनजी, बायोडिझेल, बायो-एलएनजी, ग्रीन हायइड्रोजन आणि इलेक्ट्रिक यामध्येचआता आपले भविष्य सामावले आहे. ऊर्जा आयात करणारा देश होण्याऐवजी ऊर्जा निर्यात करणारा देश बनण्याची गरज आहे. आम्ही फक्त धान्याचे उत्पादक नव्हे तर शेतकऱ्यांना विजेचे उत्पादन बनविण्याची गरज आहे. कारण धान्य उत्पादन अतिरिक्त आहे आणि विजेची कमतरता आहे. ऊर्जा आणि विजेच्या क्षेत्रात तसेच कृषी क्षेत्रात वैविध्य आणण्याची गरज आहे. जर साखर कारखाने याबाबत गांभीर्याने विचार करतील, तर हे रुपांतर गतीने होईल.

त्यांनी सांगितले की, जागतिक अर्थव्यवस्थेत सध्याच्या घटकांचा प्रभाव पाहता शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनाबाबतची रणनीती तयार करण्याची गरज आहे. ते पाहता आम्ही आपली धोरणे निश्चित करू शकतो. ते म्हणाले की, ज्ञानाचे रुपांतर संपत्तीत करणे हेही देशाचे भविष्य आहे. हे उपयुक्त नेतृत्वाचे व्हीजन आहे जे इतर घटकांना संपत्तीच्या रुपात बदल घडवत आहे. त्यासाठी जैव तंत्रज्ञानाचा वापर करून आपण बायोमासचे उत्पादन करू शकतो. त्यास जैव इंधनात परावर्तित करण्याची गरज आहे. मग ते बायो सीएनजी असेल, बायो एलएनजी असेल अथवा बायो इथेनॉल असेल. ध्वनी, वायू आणि जल प्रदूषण कमी करण्यासाठी हे आवश्यक आहे. गडकरी यांनी सांगितले की,मथुरामध्ये सांडपाण्याचे रुपांतर करणे हे याचेच एक उदाहरण आहे.

त्यांनी इलेक्ट्रिक कार्सचे महत्त्व आणि त्यांची वाढती मागणी तसेच आयात कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची मांडणी केली. गडकरी यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक कार्सची उपलब्धता खूप मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येत आहे. पुढील एक ते दीड वर्षात इलेक्ट्रिक कार्स पेट्रोलवर चालणाऱ्या कार्सच्या समान किमतीत उपलब्ध होतील.

III. “एलएनजी देशाचे भविष्यातील इंधन आहे”
गडकरी म्हणाले की, एलएनजी या क्षेत्रातील आणि देशातील भविष्याचे इंधन आहे. एलएनजीचे अर्थशास्त्र खूप सरळ आहे. बायोमासचे रुपांतर बायो सीएनजी आणि बायो एलएनजीमध्ये करणे खूप सोपे आहे. आम्ही पाइपलाइनच्या माध्यमातून सीएनजी पुरवठ्याची योजना घेऊन आलो आहोत. सर्व ठिकाणी सीएनजी पंप उघडण्यात येत आहेत. एलएनजीही उपलब्ध होत आहे. त्यामुळे आम्ही गॅस अर्थव्यवस्थेच्या दिशेने जात आहोत. यासाठी सरकारने पेट्रोल, डिझेलऐवजी सीएनजी, एलएनजीला प्राधान्य दिले आहे. आगामी काळात बायोमास आणि बायो सीएनजीसाठी बायोमासचा वापर खूप उपयुक्त ठरेल. ते म्हणाले, बांबूपासून बायो इथेनॉल निर्मिती केली जाऊ शकते. आगामी काळात पडिक जमिनीवरील बांबूचा वापर करण्याची ही योग्य वेळ आहे. याचा वापर पांढऱ्या कोळशाच्या रुपात केला जाऊ शकतो. यातून कोळसा आयात कमी करता येईल.

गडकरी यांनी सांगितले की, हरित हायड्रोजनबाबतही विचार करण्याची गरज आहे. ते म्हणाले, ग्रीन हायड्रोजन उपलब्ध होण्यास आता फार अवधी लागणार नाही. महामंडळांकडून विलगीकरण केलेल्या जैविध घटकांपासून मिथेनचे उत्पादन केले जाऊ शकते. जेव्हा यातून कार्बन डायऑक्साईड वेगळा होतो, तेव्हा ग्रीन हायड्रोजन, बायो एलएनजी, बायो सीएनजीचे उत्पादन केले जाऊ शकते.

गडकरी म्हणाले की, सांडपाण्यापासून ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन केले जाऊ शकते. नगरपालिका, विभाग आणि मंडळांमध्ये सांडपाणी सहजपणे उपलब्ध आहे. इलेक्ट्रोलायझर विकसित करण्यात आले आहेत. त्यातून सांडपाण्याचा वापर हरित हायड्रोजनचे उत्पादन करण्यासाठी केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here