औरंगाबाद : चौंडाळा (ता. पैठण) येथील रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्यावर पुन्हा एकदा पालकमंत्री संदीपान भुमरे गटाने आपले वर्चस्व सिद्ध केले. २१ जागांपैकी १४ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर उर्वरित ७ जागांसाठी निवडणूक झाली होती. या सात ही जागांवर भुमरे गटाचेच उमेदवार विजयी झाले आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये मंत्री भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांचाही समावेश आहे.
सात जागांसाठी मतदान झाले आणि सोमवारी मतमोजणी झाली. चंद्रकांत गवान्दे, लक्ष्मण डांगे, विष्णू नवथर, पुष्पा लांडगे, भागीरथी गाभूळ, द्वारकाबाई काकडे, ज्ञानदेव बढे यांचा विजयी उमेदवारांत समावेश आहे. निकालानंतर भुमरे समर्थकांनी जल्लोष केला. यावेळी राजू भुमरे, नंदलाल काळे, रवींद्र काळे, सोमनाथ परदेशी, अक्षय जायभाये आदी उपस्थित होते.