व्यापार मंत्रालयाकडून कोविड १९ ‘हेल्प डेस्क’ पुन्हा सुरू

नवी दिल्ली : व्यापार मंत्रालयाने निर्यातदार आणि आयातदारांना आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित अडचणी लक्षात घेऊन त्या सोडविण्यासाठी पुन्हा ‘हेल्प डेस्क’ सुरू केला आहे. या डेस्क अंतर्गत सीमा शुल्क खात्याकडून मंजुरीस होणारा विलंब आणि बँकांशी संबंधीत प्रकरणाची सोडवणूक केली जाणार आहे. यापूर्वी पहिल्यांदा एप्रिल २०२१ मध्ये हा हेल्प डेस्क सुरू करण्यात आला होता.

मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासचालनालयाने (डीजीएफटी) कोविड १९ची वाढती प्रकरणे पाहता निर्यात आणि आयातीच्या स्थितीवर नजर ठेवण्यासाठी आणि व्यापारी संबंधीत अडचणींची सोडवणूक करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
याबाबत डीसीएफटीने एका नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की कोविड १९ हेल्प डेस्क पुन्हा सुरू करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधीत अडचणींची सोडवणूक हा यामागील उद्देश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here