मिष्ठान फुड लिमिटेड गुजरातमधील इथेनॉल प्लांट योजनेला गती देणार

गांधीनगर: मिष्ठान फूड लिमिटेडने गुजरातमध्ये १,००० किलो लिटर प्रती दिन (केएलपीडी) धान्यावर आधारित इथेनॉल उत्पादन प्लांट सुरू करण्याच्या योजनेची घोषणा केली आहे. या प्लांटच्या उभारणीस गती दिली जाईल. कंपनीला अलिकडील गुंतवणूक, नव्या उत्पादनाचे लाँचिंग, ऑर्डर बुकिंगच्या माध्यमातून आगामी तिमाहीत आर्थिक सुधारणेची अपेक्षा आहे. तांदूळ, डाळ, इतर खाद्य उत्पादनांच्या वैविध्याची मोठी उत्पादन श्रेणी आणि वितरणात अग्रेसर असलेल्या मिष्ठान फूड लिमिटेड कंपनीने गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील दलपूर गावात इथेनॉल प्लांट स्थापन करण्याची योजना तयार केली आहे. १,००० केएलपीडी क्षमतेचे, भारतातील धान्यावर आधारित सर्वात मोठ्या इथेनॉल युनिटच्या स्थापनेसाठी कंपनीने गुजरात सरकारसोबत एक सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.

कंपनीने नियामक फायलिंगमध्ये म्हटले आहे की, प्रस्तावित योजनेसाठी कंपनीला २,२५० कोटी रुपयांची खर्च खर्च करावा लागेल. आणि त्यातून अपेक्षित वार्षिक महसूल ३,५०० कोटी रुपये आहे. २०२४च्या दुसऱ्या तिमाहीत प्लांट सुरू करण्याचे मिष्ठान्नचे उद्दिष्ट आहे. केंद्र सरकारच्या ‘आत्मानिर्भर गुजरात, आत्मनिर्भर भारत’ योजनेअंतर्गत कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी या प्लांटचा वापर केला जाईल. भारताने इथेनॉल मिश्रम २०२०-२५ च्या रोडमॅपनुसार, कच्च्या तेलाच्या आयातीवरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल योजनांच्या स्थापनेला बळ दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here