Mishtann Foods गुजरातमध्ये धान्यावर आधारित इथेनॉल प्लांट स्थापन करणार

गांधीनगर : मिष्ठान फूड्सने (MFL) गुजरातमध्ये १००० KLPD क्षमतेचा भारतातील सर्वात मोठा धान्यावर आधारित इथेनॉल प्लांट स्थापन करण्यासाठी गुजरात सरकारसोबत सामंजस्य करार (Memorandum of Understanding) केला आहे.
याबाबत बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, या प्रस्तावित योजनेचा खर्च २२५० कोटी रुपये आहे. यातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ५००० हून अधिक लोकांना रोजगार मिळेल. यातून दरवर्षी साधारणतः ३५०० कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. MFLने वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीपासून धान्यावर आधारित इथेनॉल प्लांट सुरू करण्याचे उद्दीष्ट निश्चित करून त्या अनुषंगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here