रमाला सहकारी साखर कारखान्यात पोचले आमदार

बागपत, उत्तर प्रदेश: छपरौली आमदार सहेंद्र सिंह यांनी शुक्रवारी रमाला सहकारी साखर कारखान्याचे निरीक्षण केले. साखर कारखान्यामध्ये ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ दोन नोव्हेंबर ला होत आहे, हे पाहता आमदार शुक्रवारी साखर कारखान्यामध्ये गाळप हंगामाच्या तयारीची तपासणी करण्यासाठी पोचले आणि गेल्या गाळप हंगामामध्ये शेतकर्‍यांची अडचण पाहता त्यांनी साखर कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक आरवी राम यांच्याशी चर्चा केली पुढे ते म्हणाले, जर गाळप हंगामा दरम्यान शेतकर्‍यांना समस्या निर्माण झाली तर, साखर कारखान्याचे अधिकारीच त्याला जबाबदार असतील. आमदारांनी साखर कारखाना व्यवस्थापकाला शेतकरी भवन बनवणे आणि हाईवे पासून कारखान्याकडे येणारा रस्ता रुंद करण्यासाठी सांगितले. आमदारांनी सांगितले की, साखर कारखान्यामध्ये 27 मेगावॅटच्या टरबाइन ने गेल्या गाळप हंगामामध्ये बर्‍याच प्रयत्नानंतर 20 मेगावॅट विज बनवली होती. ज्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले होते, पण यावेळी टरबाइन ला पूर्ण क्षमतेने चालवून ऊस थकबाकी भागवायची आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here