साखर कारखाना कामगारांच्या आंदोलनाला आमदारांचा पाठिंबा

बस्ती : वाल्टरगंज साखर कारखाना चालवणे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत पैसे, कारखान्यांच्या कामगारांचे थकीत वेतन आदींच्या प्रश्नांबाबत वाल्टरगंज साखर कारखान्यासमोर सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला आमदार तथा सपाचे जिल्हाध्यक्ष महेंद्रनाथ यादव यांनी आपला पाठिंबा दिला आहे. आमदार यादव यांनी सांगितले की, या महत्त्वपूर्ण समस्येबाबत विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान प्रश्न उपस्थित करून त्यांनी सरकारचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आमदार महेंद्रनाथ यांचे वाल्टरगंज साखर कारखान्याच्या कामगारांनी स्वागत केले. आमदार म्हणाले की, जेवढे शक्य असले ती सर्व मदत ऊस उत्पादक शेतकरी, कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी केली जाईल. वाल्टरगंज साखर कारखान्याने कारखान्याचे कामगार, ऊस उत्पादक शेतकरी यांचे एकूण ६२ कोटी रुपये थकवले आहेत. मात्र, प्रशासकीय अधिकारी, भाजप सरकारमधील जबाबदार अधिकारी याविषयी गप्प राहिले आहेत. यावेळी कारखान्याचे कर्मचारी अंगद वर्मा, महेश पांडेय, शेषराम वर्मा, कमलेश पटेल, परमेश्वर पांडेय, रामजनक मौर्य, गोपाल मौर्य, शेतकरी सुमित चौधरी, ओम प्रकाश चौधरी, जयदीप चौधरी, शेतकरी नेते गनीराम, डॉ. राम बहादुर चौधरी, सरपंच अमरनाथ चौधरी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here