मोदी मंत्रिमंडळात फेरबदल, नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाची फेररचना केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी करण्यात आला. यामध्ये ३६ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर सात राज्यमंत्र्यांना बढती देण्यात आली आहे. आठ नव्या चेहऱ्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये आयोजित समारंभात सर्व ४३ सदस्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या सर्व मंत्र्यांच्या खात्यांचे वाटपही करण्यात आले.

पंतप्रधान मोदी यांच्याकडे कार्मिक, पेन्शन विभाग, परमाणू ऊर्जा विभाग, अंतराळ विभाग यांसह जी खाती मंत्र्यांना देण्यात आलेली नाही, अशांचा समावेश आहे. राजनाथ सिंह यांना संरक्षण मंत्रालय, अमित शहा यांना गृह आणि सहकार मंत्रालय दिले आहे. नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते, दळणवळण तथा महामार्ग मंत्रालय ठेवण्यात आले असले तरी एमएसएमई मंत्रालय काढून घेण्यात आले आहे. निर्मला सीतारमण यांच्याकडे अर्थ आणि कॉर्पोरेट मंत्रालय कायम आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे तर एस. जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र खाते आहे. अर्जुन मुंडा यांच्याकडे जनजातीय मंत्रालय, तर स्मृती इराणी यांच्याकडे महिला व बालविकास विभाग आहे. पियूष गोयल यांच्याकडे वाणिज्य, उद्योग, ग्राहक व्यवहार, खाद्य आणि सार्वजनिक वितरण तसेच कापड उद्योग देण्यात आले आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे शिक्षण मंत्री, कौशल्य विकास, उद्योग विभाग असून प्रल्हाद जोशी यांना संसदीय कार्य मंत्रालय, कोळसा तसेच खाण मंत्रालय दिले आहे. नारायण राणे यांना सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग, सर्बानंद सोनोवाल यांना बंदरे, जहाज आणि जलमार्ग, आयुष खाते दिले आहे.

मुख्तार नक्वी यांना अल्पसंख्याक विभाग, विरेंद्र कुमार यांना सामाजिक न्याय, गिरीराज सिंह यांना ग्रामीण विकास, जोतिरादित्य सिंधिया यांना नागरिक उड्डाण विभाग, रामचंद्र प्रसाद सिंह यांना लोह उद्योग, अश्विनी वैष्णव यांना रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स, सूचना प्रसारण मंत्रालय, पशुपती कुमार पारस यांना खाद्य प्रक्रिया, उद्योग मंत्रालय, गजेंद्र सिंह शेखावत यांना जल शक्ती मंत्रालय, किरण रिजिजू यांना कायदा आणि न्याय मंत्रालय, राज कुमार सिंह यांना विद्यूत आणि ऊर्जा, हरदीप सिंह पुरी यांना पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस, मनसुख मांडविया यांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भूपेंद्र यादव यांना पर्यावरण, वन, कामगार आणि रोजगार विभाग दिला आहे. यासोबतच महेंद्र नाथ पांडे यांना अवजड उद्योग, पुरुषोत्तम रुपाला यांना मत्स्य पालन, पशूपालन, डेअरी विभाग, जी. किशन रेड्डी यांना सांस्कृतिक, पर्यटन मंत्रालय, अनुराग सिंह ठाकूर यांना सूचना आणि प्रसारण मंत्रालय देण्यात आले आहे.

तर इंद्रजित सिंह, डॉ. जितेंद्र सिंह या राज्यमंत्र्यांकडे स्वतंत्र प्रभाग आहे. इतर राज्यमंत्र्यांमध्ये श्रीपाद नाईक, फग्गनसिंह कुलस्ते, प्रल्हादसिंह पटेल, अश्विनी कुमार चौबे, अर्जुन राम मेघवाल, निवृत्त जनरल व्ही. के. सिंह, कृष्ण पाल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, साध्वी निरंजन ज्योती, डॉ. संजीव कुमार बालियान, नित्यानंद रॉय, पंकज चौधरी, अनुप्रिया सिंह पटेल, एस. पी. सिंह बघेल, राजीव चंद्रशेखर, शोभा करंदलाजे, भानी प्रताप सिंह वर्मा, दर्शना विक्रम जरदोश, व्ही. मुरलीधरन, मीनाक्षी लेखी, सोम प्रकाश, रेणुका सिंह सरुता, रामेश्वर तेली, कैशाल चौधरी, अन्नपुर्णा देवी, ए. नारायणस्वामी आदींचा समावेश आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here