सरकारचा व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, जीएसटीवरील विलंब शुल्काचा व्याजदर घटवला

सरकारने कोरोना विरोधातील लढाईच्या दरम्यान व्यावसायिकांना मोठा दिलासा दिला आहे. जीएसटी उशीरा भरल्यानंतर लावण्यात आलेल्या दंडावरील व्याज अर्थ मंत्रालयाने कमी केले आहे. उशीरा कर जमा करणाऱ्यांना १८ टक्के व्याज द्यावे लागत होते. ते आता शून्य ते ९ टक्के करण्यात आले आहे. याबाबत अर्थ मंत्रालयाने ट्वीट करून सविस्तर माहिती दिली आहे

५ कोटी रुपयांहून अधिक टर्नओव्हर असलेल्या व्यावसायिकांना आटा टॅक्स कालावधीनंतर मार्च,एप्रिल आणि मे २०२१ या काळातील उशीरा दिलेल्या शुल्कावर कोणताही विलंब आकार नसेल. त्यानंतरच्या १५ दिवसांसाठी फक्त नऊ टक्के दंड आकाराला जाणार आहे. त्यानंतर जर एखाद्याने जीएसटी भरला असेल तर त्याला १८ टक्के विलंब शुल्क भरावे लागेल.

दरम्यान नोव्हेंबर महिन्यात ग्रॉस जीएसटी कलेक्शन १,३१,५२६ कोटी रुपये झाले आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये जीएसटी कलेक्शन १,३०,१२७ कोटी रुपये झाले आहे. यामध्ये सीजीएसटी २३,८६१ कोटी रुपये, एसजीएसटी ३०,४२१ कोटी रुपये, आयजीएसटी ६७,३६१ कोटी रुपये आणि त्यावरील उपकर ८,४८४ कोटी रुपये आहे. ऑक्टोबर महिन्यात जीएसटी वसुली सर्वाधिक झाली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here