मोदी नॅचुरल्सने छत्तीसगडमध्ये ग्रीनफील्ड इथेनॉल डिस्टिलरीचे केले भूमिपूजन

रायपूर : मोदी नॅच्युरल्स लिमिटेडने अलिकडेच छत्तीसगडच्या रायपूरमध्ये आपल्या ग्रीनफिल्ड इथेनॉल डिस्टिलरीचे भूमिपूजन केले. कंपनी एक अत्याधुनिक डिस्टिलरी स्थापन करीत आहे. त्याची उत्पादन क्षमता २१० केएलडी असेल. यामध्ये ६६ एमडब्ल्यू को-जनरेशन पॉवर प्लांट आहे. हा प्लांट स्थापन करण्यासाठी मोदी नॅच्युरल्स लिमिटेडने मोदी बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड (एमबीपीएल) ही सहाय्यक कंपनी स्थापन केली आहे.

एमबीपीएलला केंद्र सरकारकडून इथेनॉल निर्मितीसाठी २१० केएलडी डिस्टिलरीसाठी मंजुरी मिळाली आहे. याचबरोबर छत्तीसगड सरकारसोबत त्यांनी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. कंपनीला आधीच पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या योजनांसाठी पर्यावरण मंजुरी मिळाली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या तिसऱ्या तिमाहिती १६० कोटी रुपये गुंतवणुकीबरोबरच ११० केएलडीच्या पहिल्या टप्प्यात आणि पुढील दोन वर्षात २५० कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे.

मोदी नॅच्युरल्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक अक्षय मोदी म्हणाले, या नव्या प्लांटसोबत आम्ही वाहन उत्सर्जन, हवेची गुणवत्ता सुधारणा, ग्राहकांना इंधनाचा कमी दर, खराब अन्नधान्याचा उपयोग, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, रोजगार संधी आणि अधिक गुंतवणुकीच्या संधीशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यास सज्ज आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here