अमेरिकेत आज पाच दिग्गज कंपन्यांच्या सीईओंना भेटणार पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. आज, पहिल्या दिवशी ते वॉशिंग्टनमध्ये पाच दिग्गज अमेरिकन कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. यादरम्यान भारत-अमेरिका यांदरम्यान व्यवसाय विकसित करण्याच्या शक्यतेवर चर्चा होईल.

पंतप्रधान मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या निमंत्रणानुसार २३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. गेल्यावर्षी बायडेन यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मोदी यांचा हा पहिला अमेरिका दौरा आहे. यापूर्वी हे दोन्ही नेत्यांमध्ये तीनवेळा व्हर्च्युअल बैठका झाल्या आहेत. मार्चमध्ये क्वाड समिट, एप्रिलमध्ये क्लायमेट चेंज समिट आणि जूनमध्ये जी ७ परिषदेच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे.

अमेरिकन कंपनी क्वालकॉमचे सीईओ क्रिस्टानियो आर. एमॉन, अॅडोबचे शांतनू नारायण, फर्स्ट सोलरचे मार्क विडमर, जनरल अॅटॉमिक्सचे विवेक लाल, ब्लॅकस्टोनचे स्टीफन ए. श्वार्जमॅन यांची आज पंतप्रधानांशी भेट होईल. या स्वतंत्र भेटी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here