ऊस बिलासाठीचे पैसे कारखान्यांनी दुसरीकडेच खर्च केले; शेतकरी संतप्त

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

मेरठ: उत्तर प्रदेशात उसाचे आंदोलन तीव्र होताना दिसत आहे. थकीत ऊस बिलांसाठी शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरत आहेत. मेरठ आयुक्तालय क्षेत्रातील १६ पैकी दहा साखर कारखाने मालकांनी बंद केले आहेत. दुसरीकडे मुजफ्फरनगरमधील साखर करखान्यांनी शेतकऱ्यांच्या बिलांसाठीचे पैसै दुसरीकडेच खर्च केल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीत ही बाब समोर आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सात खासगी साखर कारखान्याना नोटिस पाठवली आहे. दुसरीकडे बिजनौरमध्ये शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन करत सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. त्याचबरोबर मुजफ्फरनगरमधील एका ऊस केंद्रावर उसाचे वजन होत असल्याचे पाहून संतप्त शेतकऱ्यांनी पानीपत खटीमा मार्गावर रास्ता रोको केले आहे.

शेतकरी चिंताग्रस्त

यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना कारखान्यांसाठी ऊस देण्यात खूपच त्रास सहन करावा लागला. सुरुवातीला कारखान्यांकडून पावत्या करून घेण्यात आल्या. हंगाम अंतिम टप्प्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली त्यावेळी शेवटचा ऊस जाईपर्यंत कारखाने सुरूच ठेवण्याचे राज्य सरकारने जाहीर केले. पण, साखर कारखान्यांनी कारखाने बंद करण्यास सुरुवात केली आहे. ९ मे पर्यंत मेरठ आयुक्तालयातील ६ जिल्ह्यांमधील १६ पैकी १० कारखाने बंद झाले आहेत. आयुक्तालय क्षेत्रातील अडीच हजार कोटी रुपयांची ऊस बिल थकबाकी आहे.
सरकारने १४ दिवसांत ऊस बिल भागवण्याच्या नियमाची आठवण करून देऊनही शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडत नसल्याचे दिसत आहे. सरकारने ऊस बिले भागवण्यासाठी कारखान्यांसाठी सॉफ्ट लोन योजनेची घोषणा केली. यातून जवळपास सहा कारखान्यांच्या खात्यांवर पैसे जमा करण्यात आले. पण, शेतकऱ्यांच्या हातात काहीच मिळाले नाही.

शेतकरी संतप्त

बिजनौरमध्ये शेतकऱ्यांनी ऊस बिल थकबाकी संदर्भात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. धामपूर, स्योहारा आणि कोतवाली देहात येथे भारतीय किसान यूनियनची पंचायत बैठक झाली त्यात उसाची थकीत बिल देण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा १५ दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here