मान्सूनने संपूर्ण देश व्यापला

685

केरळात ८ जून रोजी दाखल झालेल्या मान्सूनने १९ जुलै रोजी संपूर्ण देश व्यापल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली आहे. मागील आठवड्यात, हिमालयाच्या पायथ्याशी पाऊस केंद्रित झाल्यामुळे देशाच्या पूर्वेकडील भागात पाउस जास्त झाला. तर दुसरीकडे, मध्य आणि दक्षिण भागात कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या राज्यांतील खरीफ पिकांच्या लागवडीचे प्रमाण कमी झाले आहे. केरळमधल्या पाच जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात पाऊस पडल्यामुळे या भागात रेंड अलर्ट जारी करण्यात आला. आयएमडीच्या अहवालानुसार 25 जुलैनंतर मान्सूनचे पुरनागमन होऊ शकते. केरळ आणि पश्‍चिम किनाऱ्यावरील इतर ठिकाणी पुढील तीन ते चार दिवसांसाठी ’रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांत मान्सून हिमालयच्या पायथ्याशी सक्रिय आहे. परंतु, बंगालच्या खाणीत कमी प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता असून 25 जुलैच्या आसपास मान्सूनचे पुनरागमन अपेक्षित आहे, असे पुणे येथील आयएमडी (हवामान अनुसंधान व सेवा) चे संचालक डी एस पाई यांनी सांगितले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here