नाशिकसह या चार जिल्ह्यात पोहोचला मान्सून, आगामी काळात असा बरसणार पाऊस

मुंबई : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुले आणि नंदुरबार जिल्ह्यात मान्सून पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन ते चार दिवसांत या भागात हलका ते मध्यम पाऊस कोसळेल. आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या भागात चांगला पाऊस झाल्याने शेतीसाठी खूप मदत होईल. सोमवारी रात्री मालेगाव, कळवा, सिन्नर, चांदवड, निफाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात पाऊस कोसळला.

याबाबत एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, पुणे आयएमडीच्या के. एस. होसलीकर यांनी सांगितले की, मान्सून उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांत पोहोचला आहे. या जिल्ह्यांत बुधवारपासून पुढील चार दिवस हलका ते मध्यम पाऊस कोसळेल. नाशिक जिल्ह्यात सध्या अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांनी सांगितले की, काही ठिकाणी अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. दरम्यान, टाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, सिन्नर, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, येवला येथे किरकोळ पाऊस झाला आहे. नंदूरबार, अक्कलकुवा, नंदुरबार तालुक्यात चांगला पाऊस पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here