मान्सूनची चाहूल : महाराष्ट्रात काही साखर कारखाने जूनमध्येही सुरू राहणार

पुणे : मान्सून लवकरच सुरू होण्याचे अनुमान असल्याने महाराष्ट्रातील साखर उद्योगाची चिंता वाढली आहे. कारण, २३ लाख टन ऊसाचे गाळप अद्यापही शिल्लक आहे. याबाबत इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, राज्यातील पाच साखर कारखान्यांना जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गाळप सुरू ठेवावे लागेल. २०२१-२२ या हंगामात ऊसाच्या बंपर उत्पादनामुळे राज्याकडून उच्चांकी साखर उत्पादनाचा नवा विक्रम प्रस्थापित केला जाईल अशी शक्यता आहे. ९ मे अखेर राज्यात १,२८८.५२ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले असून १३४.२८ लाख टन साखर उत्पादन करण्यात आले आहे. राज्यातील गाळप हंगामात सहभाग घेतलेल्या १९८ साखर कारखान्यापैकी १०६ कारखान्यांचे गाळप समाप्त झाले आहे. २३ लाख टन अतिरिक्त उसासह साखर उत्पादनाचा १३५ लाख टनाचा आकडा पाक केला जाईल अशी शक्यता आहे.

साखर आयुक्तांनी सांगितले की, राज्यात जवळपास सर्व कारखाने मे अखेरीस आपला हंगाम समाप्त करतील. मात्र, बीड, जालना आणि उस्मानाबादमधील पाच कारखाने जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आपले कामकाज सुरू ठेवतील. मान्सून नेहमीपेक्षा आधी येण्याच्या शक्यतेसह कारखान्यांना तोडणी आणि गाळप गतीने करावे लागेल. महाराष्ट्राच्या साखर उद्योगाच्या इतिहासात पहिल्यांदाच ही स्थिती निर्माण झाली आहे, जेव्हा मान्सूनच्या सुरुवातीपर्यंत गाळप केले जाईल. गायकवाड यांनी सांगितले की राज्य सरकार मान्सून येण्यापूर्वी कारखान्यांचे गाळप पूर्ण करण्यासाठी डायव्हर्जनची योजना तयार करीत आहे.

या हंगामात मान्सून सामान्य काळापूर्वी येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले उसाचे पिक गमावण्याची भीती आहे. योजनेअंतर्गत जालन्याहून एक लाख टन ऊस अहमदनगर, परभणी, बुलढाणा, औरंगाबाद येथील सहा कारखान्यांना गाळपासाठी पाठवला जाईल. अशाच पद्धतीने ७५,००० टन ऊस उस्मानाबादहून सोलापूर आणि ६१,००० टन ऊस औरंगाबादहून इतर क्षेत्रात पाठवला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here