देशात 2024 मध्ये मान्सून सामान्य राहण्याची शक्यता : स्कायमेट

नई दिल्ली : देशवासीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे यंदा देशात एल निनो फारसा सक्रीय राहण्याची शक्यता कमी असून पाऊस चांगला पडू शकतो. Skymetweather.com चे संस्थापक आणि CEO जतिन सिंग यांनी भारतात 2024 मध्ये मान्सून चांगला राहण्याची शक्यता वर्तवली आहे. स्कायमेटच्या मते, यंदा एल निनो कमकुवत राहणार असल्याने त्याचा मान्सूनवर फारसा फरक पडणार नाही. सक्रिय एल निनोमुळे मान्सून कमकुवत होतो. त्यामुळे पाऊस कमी होऊन शेतीवर विपरित परिणाम होतो. सिंग म्हणाले की, सध्याचे संकेत आगामीमान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती सूचित करत आहेत. मान्सूनच्या अधिक तपशीलवार विश्लेषणासाठी स्कायमेटने एप्रिलमध्ये अपडेट जारी करण्याची योजना आखली आहे. सध्या व्यक्त करण्यात आलेल्या प्राथमिक अंदाजाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here