मॉन्सून कर्नाटकात पोहोचला, उत्तर भारताला उकाड्यापासून दिलासा

नवी दिल्ली : देशाचे वातावरण गतीने बदलत आहे. एकीकडे दक्षिणेत मॉन्सून पोहोचला आहे. तर पश्चिम विभागातील सक्रीयतेमुळे दिल्ली-एनसीआरचे हवामान बदलले आहे. अनेक ठिकाणी जोरदार वारे आणि हलका पाऊस झाला आहे. भंयकर उकाड्याला तोंड देणाऱ्या दिल्लीला दिलासा मिळाला आहे. आज दिल्ली एनसीआरमध्ये ढगाळ वातावरण होते. तीस ते ४० प्रती तास वेगाने वारे वाहिले. यासोबतच हलक्या पावसाची शक्यता आहे.

दुसरीकडे पंजाबमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. उत्तराखंडच्या डोंगराळ भागात पाऊस सुरू आहे. दक्षिणेत मॉन्सून पोहोचला आहे. तामीळनाडू, कर्नाटकसह अनेक राज्यांना पावसाचा अॅलर्ट देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशाचेही हवामान बदलले आहे. अनेक जिल्ह्यांत कालपासून हवामान बदलले. दक्षिण-पश्चिम मॉन्सून पुढे सरकून शुक्रवारी दक्षिण अरबी समुद्र, मध्य अरबी समुद्राचा काही भाग आणि लक्षद्वीप, केरळ, कर्नाटकच्या बहुसंख्य भागात पसरला. भारतीय हवामान विभागाने मॉन्सून उत्तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामीळनाडूत आणि दक्षिण – पश्चिम बंगालच्या खाडीत आल्याचे सांगितले.

पुढील २-३ दिवसांत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकातील उर्वरीत भाग, आंध्र प्रदेशचा बहुसंख्य भाग, तेलंगणा, तामीळनाडूत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here