केरळमध्ये मॉन्सून ३ जून रोजी पोहोचणार, आयएमडीचा अंदाज

नवी दिल्‍ली : केरळमध्ये मॉन्सून तीन जूनपर्यंत येऊ शकतो असे अनुमान भारतीय हवामान विभागाने व्यक्त केले आहे. तर स्कायमेट या खासगी हवामान एजन्सीने मॉन्सून केरळमध्ये पोहोचल्याचे म्हटले आहे. यापूर्वी आयएमडीने ३१ मे रोजी मॉन्सून केरळमध्ये पोहोचेल अशी शक्यता वर्तवली होती.

विभागाने सांगितले की, एक जूनपासून दक्षिण-पश्चिमेकडून हवेचा जोर वाढेल. त्यामुळे केरळमध्ये पावसाळी वातावरणात लक्षणीय बदल होतील. तर केरळमध्ये तीन जूनच्या आसपास मॉन्सून पोहोचण्याची अपेक्षा आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी दक्षिण-पश्चिम मॉन्सून नेहमीप्रमाणे राहील. जून पासून सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता असेल. याआधी एक महिन्यापूर्वी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन यांनी सांगितले की, मॉन्सूनचा कालावधी सरासरी ९८ टक्के राहील. ही सामान्य श्रेणी आहे. एलपीए १९६१-२०१० यांदरम्यान मॉन्सूनमध्ये झालेल्या पावसाची सरासरी ८८ सेंटीमिटर असते. ९८ टक्के अनुमान असेल तर यंदाच्या हंगामात सुमारे ८६.२ से.मी. पाऊस होईल.

जर केरळमधील १४ हवामान केंद्रांवर १० मे नंतर सलग दोन दिवस २.५ मिलीमीटर अथवा त्यापेक्षा अधिक पाऊस झाल्यास त्याच्या दुसऱ्या दिवशी मॉन्सून आल्याची घोषणा केली जाते. गेल्या काही दिवसांत हा निकष पूर्ण झाला असला तरी आणखी काही निकष महत्त्वाचे आहेत. यांदरम्यान, किमान वाऱ्याचा वेग, आउटगोइंग लॉंगवेव्ह रेडिएशन याचा यात समावेश असतो.
ज्यावेळी दक्षिण-पश्चिम मॉन्सून केरळला पहिल्यांदा धडकतो तेव्हा मॉन्सून सुरू झाल्याचे म्हटले जाते. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात आणि राजस्थानमधून सप्टेंबरपर्यंत तो परत फिरतो. यंदा मॉन्सून सामान्य राहण्याची शक्यता ४० टक्के आहे. तर २१ टक्के शक्यता सामान्यपेक्षा अधिक पावसाची आहे. दिल्लीत जूनच्या अखेरीस मॉन्सून पोहोचेल असे स्कायमेट वेदरने म्हटले आहे. मात्र, त्यात १० ते १५ टक्क्यांची घट राहील असे अनुमान आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here