नवी दिल्ली : देशातील मान्सून वेळेनंतरही सक्रिय आहे. त्यामुळे गुजरात, बंगाल आणि महाराष्ट्रासह अनेक ठिकाणच्या नद्यांचा जल स्तर वाढला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुराचे संकट घोंघावत आहे. भारतीय हवामान विभागाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश यांसह देशातील दहा राज्यांत पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविली आहे.
याबाबतच्या अधिकृत बुलेटिनमध्ये आयएमडीने म्हटले आहे की, दक्षिण-पश्चिम झारखंड, छत्तीसगडच्या उत्तर चक्रीय स्थितीमुळे हवेचा दबाव कायम आहे. पुढील २४ तासात हा दबाव कमी होऊ शकतो. पुढील तीन दिवस छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या उत्तर भागात मान्सून पुढे सरकरण्याची शक्यता आहे. याशिवाय पश्चिम राजस्थान आणि आसपासच्या भागात २४ डिसेंबरपर्यंत स्थिती पावसाळी राहील. त्यामुळे २६ सप्टेंबरपर्यंत पूर्व राजस्थान आणि गुजरातमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. छत्तीसगड, विदर्भ, मध्य प्रदेशासह महाराष्ट्र, गोवा, कोकण, मराठवाड्यात २३ सप्टेंबरपर्यंत पाऊस कोसळेल. तर उत्तराखंडमध्ये २६ सप्टेंबरपर्यंत पाऊस सुरूच राहील.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार गुजरातच्या वडोदरा शहरातील वाघोडीया तहसीलमध्ये अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. महाराष्ट्रातील नाशिकमध्येही अशीच स्थिती आहे. तेथे गोदावरी नदीची पाणीपातळी वाढली आहे. आणखी काही दिवस मान्सून सक्रीय राहण्याची शक्यता आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link